एक्स्प्लोर

Nagpur : 'या' कारणांमुळे वाढते समाजात विषमता, न्या. जयदीप पांडे यांनी सांगितले कारण

बालकांचे विविध प्रकारच्या अत्याचार व शोषणापासून  संरक्षण कायद्याच्या आधारावरच केले जाते. मुलांच्या विकासावरच देशाचा विकास साधता येतो. असे मार्गदर्शन मान्यवरांनी कार्यक्रमात केले.

नागपूर : आपल्या अधिकारांची जाणीव नसल्याने समाजात विविध प्रकारचे भेदभाव निर्माण होतात. आपल्या अधिकार आणि कायद्याची जाणीव असली तर व्यक्ती अन्याय सहन करत नाही. त्याविरोधात पुढाकार घेऊन समोर येतो. त्यामुळे नागरिकांमध्ये कायद्याबद्दल जनजागृती केल्यास हा भेदभाव नष्ट करता येतो, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर जयदीप पांडे यांनी केले.  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जी.एस. रायसोनी विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रायसोनी कॉलेज येथील विवेकानंद सभागृहात जागतिक समाजिक न्याय दिवस, राज्य व केंद्र शासनाची असलेली विविध सार्वजनिक सेवा व योग्य कामासाठी योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ आणि शिक्षणाचा अधिकार व बालकांचे अधिकार या विषयांवर कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.

कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर जयदीप पांडे, प्राधिकरणाचे सदस्य राजेंद्र राठी, जी.एस.रायसोनी विधी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक पावडे, प्राचार्य किर्ती राठोड यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. न्यायाधीश पांडे लैंगिक गुन्हयांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 यावर माहिती देतांना बालकांचे हित व संरक्षण अधिकाराबाबत उचित तरतूदी या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत, असे सांगितले. बालकांचे लैंगिक शोषण करणे अपराध आहे. बालकांची काळजी व संरक्षणाबाबत या कायद्यामध्ये तरतूदी केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

ॲङ राजेंद्र राठी यांनी उपस्थितांना सामाजिक न्याय विभागांतर्गत नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ आणि शिक्षणाचा अधिकार व बालकांचे अधिकार या विषयी माहिती दिली. बालकांचे विविध प्रकारच्या अत्याचार व शोषणापासून  संरक्षण कायद्याच्या आधारावरच केले जाते. मुलांच्या विकासावरच देशाचा विकास साधता येतो. तसेच भारतीय राज्य घटनेतील मुलांशी संबंधित तरतुदी व योजनेचे मुख्य उद्देश ठेवून बालकांचे मुलभूत हक्क आणि लाभ यांची रुपरेषा आखणे, देखभाल व संरक्षणाची गरज असलेली मुले तसेच विधी संघर्षग्रस्त बालके यांची बाजू मांडण्यासाठी त्यांना खात्रीशीररित्या कायदेतज्ञांनी मदत उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे सांगितले.

प्रास्ताविकात अशोक पावडे यांनी आंतरराष्ट्रीय न्याय दिवसाचे उद्देश सांगून सामाजिक न्याय विभागातर्फे  राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्राचार्य किर्ती राठोड यांनी  केले. या कार्यक्रमास 70 विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Embed widget