एक्स्प्लोर

Nandurbar Bribe : 8 लाखांची लाच घेताना PWD उपअभियंता रंगेहात अटक; ठेकेदाराचे बिल पास करण्यासाठी मागितले पैसे

Nandurbar PWD Bribe Case : धुळे लाचलुचपत विभागाने (Dhule ACB Action) नितीन इंगळे याला विद्युत ठेकेदाराकडून लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. 

धुळे : विद्युत ठेकेदाराकडून बिलाच्या मोबदल्यात 8.50 लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती 8 लाख रुपये स्वीकारने उपअभियंत्याला चांगलंच महागात पडलं. नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) विद्युत उपविभागाचा उपअभियंता नितीन इंगळे याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. ही कारवाई धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सोमवारी सायंकाळी करण्यात आली. या घटनेमुळे विभागात एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हा शासकीय नोंदणीकृत विद्युत ठेकेदार असून त्याने शासनाच्या विविध विद्युत कामांचे ठेके घेतले होते. संबंधित प्रकरणात बिल अदा करण्याच्या बदल्यात लाच मागितल्याची तक्रार ACBकडे करण्यात आली होती.

28 गावांतील सोलर स्ट्रीट लाईट कामाचा ठेका (Solar Street Light Project Tender)

सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील 28 गावांमध्ये आणि पाड्यांमध्ये LED सोलर स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम तक्रारदारांच्या फर्मला मंजूर झाले होते. जीएसटी वगळता 2 कोटी 37 लाख 29 हजार 356 रुपयांची निविदा मंजूर होऊन कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली होती. संबंधित कामे मुदतीत पूर्ण करण्यात आली.

मार्च 2025 मध्ये 41 लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले होते. त्या वेळी उपअभियंता नितीन इंगळे याने 80 हजार रुपये स्वीकारून उर्वरित रक्कम पुढील बिलावेळी देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे.

पुढील बिलासाठी 8.50 लाखांची मागणी (Bribe Demand Case)

डिसेंबर 2025 मध्ये उर्वरित कामाचे 2 कोटी 2 लाख 5 हजार 525 रुपये तक्रारदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर उपअभियंत्याने बिल अदा केल्याच्या मोबदल्यात 8 लाख 50 हजार रुपयांची लाच मागितली. पैसे दिल्याशिवाय पुढील कामांच्या बिलांवर सह्या करणार नसल्याचेही सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACBने सापळा रचला. तडजोडीअंती उपअभियंत्याने 8 लाख रुपये स्वीकारण्याचं मान्य केलं.

धुळे ACBची रंगेहात कारवाई (ACB Trap Action Dhule)

सोमवार, 9 फ्रेब्रुवारी रोजी सायंकाळी धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात नितीन इंगळे याला तक्रारदारांकडून 8 लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर त्याला तात्काळ अटक करण्यात आली. या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली असून लाचखोरीविरोधातील कारवाई अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget