एक्स्प्लोर

Dhule Bribe News: आयजी धुळे दौऱ्यावर असतानाच एसीबीची मोठी कारवाई, चार लाचखोर पोलीस रंगेहात पकडले, पोलीस दलात खळबळ

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे धुळे दौऱ्यावर असतानाच एसीबीने चार लाचखोर पोलिसांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

Dhule Bribe News: एकीकडे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे (IG Dattatray Karale) हे धुळे महापालिका निवडणुकीच्या (Dhule Municipal Election 2026) पार्श्वभूमीवर सुव्यवस्था आणि पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी धुळे दौऱ्यावर असतानाच, दुसरीकडे जिल्ह्यातील पोलीस दलाला नामोहरम करणारी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शिरपूर शहरात थाळनेर पोलीस ठाण्यातील एका हवालदारासह तीन पोलीस कॉन्स्टेबलना 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा-सुव्यवस्था, बंदोबस्त आणि संवेदनशील भागांचा आढावा घेण्यासाठी आयजी दत्तात्रय कराळे हे सध्या धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. अशा वेळी पोलीस यंत्रणा अत्यंत सतर्क आणि शिस्तबद्ध असते. मात्र, याच कालावधीत एसीबीने केलेल्या या कारवाईमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संपूर्ण प्रशासनाच्या भुवया उंचावल्या आहेत.

Dhule Bribe News: जुन्या गुन्ह्याचा गैरफायदा घेत लाच मागितल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (एनडीपीएस) दाखल असलेल्या एका जुन्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या वडिलांना अटक न करण्यासाठी थाळनेर पोलीस ठाण्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांनी 3 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 2 लाख रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे दाखल होताच शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात सापळा रचण्यात आला.

Dhule Bribe News: करवंद नाक्यावर सापळा, एकास अटक

शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील करवंद नाक्यावर कॉन्स्टेबल मुकेश गिलदार पावरा (वय 33, रा. शिरपूर) याने तक्रारदाराकडून लाच स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर एसीबीच्या पथकाने कारवाई केली. पथकातील कर्मचारी साध्या वेशात परिसरात तैनात होते. लाच स्वीकारल्याचा इशारा मिळताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पावराला तात्काळ ताब्यात घेतले.

Dhule Bribe News: एसीबीच्या जाळ्यात अडकलेले ‘चौघे’

या कारवाईत खालील पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.

भूषण रामोळे – पोलीस हवालदार

धनराज मालचे – पोलीस कॉन्स्टेबल

किरण सोनवणे – पोलीस कॉन्स्टेबल

मुकेश गिलदार पावरा – पोलीस कॉन्स्टेबल

मात्र, एसीबी पथकाचा सुगावा लागताच दोन संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आली आहेत.

Dhule Bribe News: आयजी जिल्ह्यात असतानाच कारवाई, चर्चांना उधाण

विशेष बाब म्हणजे, आयजी दत्तात्रय कराळे जिल्ह्यात असताना सहसा पोलीस दल अत्यंत शिस्तीत आणि नियंत्रणात असते. अशा परिस्थितीत पोलिसांकडूनच लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे जिल्हाभर उलटसुलट चर्चा सुरू असून, वरिष्ठ स्तरावरून कडक कारवाईचे संकेत दिले जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, एसीबीने पुढील तपास वेगाने सुरू केला असून फरार आरोपींचा शोध आणि या प्रकरणातील इतर सहभागाची चौकशी करण्यात येत आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Nashik Bribe: नाशिकमध्ये खाकी वर्दीला डाग लागला, अटकपूर्व जामिनासाठी दोघांनी मागितली दोन लाखांची लाच, गुन्हा दाखल होताच पोलीस पसार

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : मला दहावी-बारावीत चांगले गुण, B.Sc पदवी घेतलीय; जयराम चाटेचा जामीनासाठी जगावेगळा युक्तिवाद, संतोष देशमुख हत्याकांडात मोठी अपडेट
मला दहावी-बारावीत चांगले गुण, B.Sc पदवी घेतलीय; जयराम चाटेचा जामीनासाठी जगावेगळा युक्तिवाद, संतोष देशमुख हत्याकांडात मोठी अपडेट
Mumbai Crime : मुंबईत पोलीस स्टेशन शेजारीच थरार! दारूच्या नशेत पतीने पत्नीला दगडाने ठेचून संपवलं; ओशिवरा परिसरामध्ये खळबळ
मुंबईत पोलीस स्टेशन शेजारीच थरार! दारूच्या नशेत पतीने पत्नीला दगडाने ठेचून संपवलं; ओशिवरा परिसरामध्ये खळबळ
Navi Mumbai Crime : 11 महिन्यांनंतर ऐरोलीतील 'मर्डर मिस्ट्री' उघड! अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; 40 सिमकार्ड बदलून मोठा खेळ खेळला
11 महिन्यांनंतर ऐरोलीतील 'मर्डर मिस्ट्री' उघड! अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; 40 सिमकार्ड बदलून मोठा खेळ खेळला
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget