धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. काही वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने दुसरे लग्न केले. याची सल मनात ठेवून साक्री तालुक्यातील आमळी येथील आश्रम शाळेत (Ashram Shala) शिकत असलेल्या अकरा वर्षीय मुलाने टोकाचे पाउल उचलल्याचे समोर आले आहे. आश्रम शाळेतील शौचालयाजवळ गळफास (Suicide) घेत त्याने मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. अनिल कोमशा पाडवी असं आत्महत्या (Student Suicide) केलेल्या पाचवीतील विद्यार्थ्यांचे नाव आहे.


अधिक माहितीनुसार, अनिल हा मूळचा धुळे (Dhule District) जिल्ह्यातील असून, काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलाचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर लागलीच त्याच्या आईने दुसरे लग्न केले आणि दुसऱ्या पतीसोबत घरातून निघून गेली. अनिल पाडवी याला एक लहान बहिण असून, तीसुध्दा आमळी येथील कर्म. बापूसाहेब डि.के.अनुदानित आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे. तर, अनिल सुद्धा पिंपळणारे येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेत पाचवी इयत्तेत शिकत होता. मात्री, अचानक त्याचा रात्रीच्या सुमारास  शाळेतील शौचालयाजवळ गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. 


दरम्यान, शौचालयासाठी जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तातडीने आश्रम शाळेच्या अधीक्षकास सांगितले. तशाच अवस्थेत या विद्यार्थ्याला रुग्णालयात घेऊन जात असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार अनिल पाडवी हा विद्यार्थी गेल्या वर्षी चौथीपासून या शाळेत होता. त्याची सावत्र बहीणदेखील याच शाळेत पाचवीत आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास मुलांसोबत वसतिगृह इमारतीच्या खाली मैदानावर खेळत होता. सायंकाळच्या जेवणानंतर तो दुसऱ्या मजल्यावर असेलल्या त्याच्या रूममध्ये गेला. पण, रात्री उशिरा खाली असलेल्या शौचालयाजवळ लोखंडी अँगलला त्याने नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे समोर आले. काही विद्यार्थ्यांनी बाब तातडीने वसतिगृह अधीक्षक समुवेल गावित यांना सांगितली आणि त्यानंतर घटना उघडकीस आली. 


घटनेमुळे परिसरात हळहळ 


वसतिगृह अधीक्षकांनी त्याला तातडीने तशाच अवस्थेत रुग्णालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. पोलिसाना घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पाहणी केली.अनपेक्षित घडलेल्या घटनेमुळे आश्रमशाळेत शोककळा पसरली. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. एकीकडे वडिलांचे छत्र हरपले, दुसरीकडे लहान मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त येत आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Dhule News : 'आई-दादा मला माफ करा, लवकर जात आहे! धुळ्याच्या साक्री तालुक्यात प्रेमीयुगुलाने उचललं टोकाचं पाऊल