नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून गुन्ह्यात फरार झालेल्या संशयितांचा देखील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी घराजवळच असलेल्या विहिरीत मृतदेह (Suicide) आढळला असून तीनच दिवसात आरोपी आणि पिडीत तरुणीच्या मृत्यूमुळे दिंडोरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेची ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली असून दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस नाईकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 


दिंडोरी पोलीस ठाण्यात (Dindori Police) 27 सप्टेंबरला पिंपळनारे गावातील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या 35 वर्षीय उमेश खांदवे या विवाहित इसमावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. तपास सुरु असताना या प्रकरणातील पीडितेने आत्महत्या केल्याचे समोर आले. दरम्यान संशयित उमेश खांदवे यास पोलिसांकडून तपासाकडून स्पॉट घेऊन गेले होते. येथून परतत असताना संशयिताने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला होता. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. असे असतानाच आज सकाळी फरार संशयिताने देखील घराजवळील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचे तालुक्यात खळबळ उडाली आहे. 


दरम्यान दिंडोरी तालुक्यातील (Dindori) हे प्रकरण संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असून मागील तीनच दिवसात आरोपी आणि पीडीत महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून दिंडोरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस नाईकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एकूणच या प्रकरणात सुरवातीला संशयित फरार झाला, त्यानंतर पीडित युवती बेपत्ता झाली, दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मृतदेह आढळून आला. त्यातच आज प्रकरणातील संशयित उमेश खांदवे यांनी आत्महत्या केल्याने आता पोलीस पुढील काय करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


प्रकरण नेमकं काय आहे? 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरी पोलीस ठाण्यात (Dindori Police) 27 सप्टेंबरला पिंपळनारे गावातील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या 35 वर्षीय उमेश खांदवे या विवाहित इसमावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. एका वीस वर्षीय युवतीवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पोलीस तपासातून ती मुलगी काही महिन्यांची गर्भवती असल्याचंही समोर आलं होत. दरम्यान या आरोपीला न्यायालयाने 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपी उमेशला तपासकामी त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwer) घेऊन गेले असता तिथून परतत असतांना नाशिक शहरातील गंगापूर रोडवर लघुशंकेच्या बहाण्याने उमेश खांदवे पोलीस वाहनातून खाली उतरला आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका देऊन त्याने पळ काढला. त्यातच आज त्याचा मृतदेह आढळून आल्याने प्रकरण चर्चेत आले आहे. 



इतर महत्वाची बातमी : 


Nashik News : नाशिकमध्ये अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी फरार, पीडितेचा मृतदेह आढळला, नेमकं प्रकरण काय?