धुळे : शंभर आणि पाचशे रुपयांचे स्टॅम्प बंद (Stamp) करू नये, अन्यथा मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मुद्रांक विक्रेत्यांनी दिला आहे. जमीन किंवा फ्लॅटच्या खरेदी विक्रीसाठी सध्या वापरात येणारे शंभर आणि पाचशे रुपयांचे स्टॅम्प बंद करण्यात येणार आहे. या स्टॅम्पऐवजी फ्रँकिंग मशिनचा वापर करण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केला आहे. धुळ्यातील (Dhule) स्टॅम्प वेंडर चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे.


जमिनीचे व्यवहार खरेदी विक्री (Land transactions) यासारख्या कायदेशीर गोष्टींसाठी 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर वापरले जातात. मात्र गेल्या काही वर्षात या स्टॅम्प पेपरमुळे अनेक गैरप्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता हे स्टॅम्प पेपर (Stamp Pepar) व्यवहारातून बाद होणार असल्याची माहिती आहे. त्याऐवजी तेवढेच किमतीचे स्टॅम्प पेपर राष्ट्रीय बँकेतून फ्रॅकिंग करून मिळणार आहेत. त्यामुळे गैर व्यवहारांना आळा बसणार आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर धुळ्यातील मुद्रांक विक्रेते एकवटले असून शासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. आता पुढे होणाऱ्या मंत्रिमंडळाने 100 आणि 500 रुपयाचे स्टॅम्प बंद करण्याचा असा कुठलाही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करू नये, अशी मागणी मुद्रांक विक्रेत्यांकडून करण्यात आली आहे. 


'इंग्रजांच्या काळापासून मुद्रांक विक्रेते आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करीत आहेत. कुठल्याही प्रकारची कोणाची आमच्याबद्दल तक्रार नाही. महाराष्ट्रात गाजलेल्या तेलगी घोटाळ्यात सुद्धा एकही मुद्रांक विक्रेत्याचा सहभाग नव्हता हे विशेष आहे. महाराष्ट्रातून सुमारे साडेतीन हजारच्या आसपास मुद्रांक विक्रेता आहे. मुद्रांक विक्रेत्याच्या व्यवसायावर कुटुंबावर अवलंब आहे. मुद्रांक विक्री बँकांना देऊन महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेत्यांना देशोधडीला लावण्याचे काम तिथले महाराष्ट्र सरकार करत आहे, असे त्यांनी करू नये, अन्यथा येणाऱ्या काळात त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. आता पुढे होणाऱ्या मंत्रिमंडळाने 100 आणि 500 रुपयाचे स्टॅम्प बंद करण्याचा असा कुठलाही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करू नये, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात मुद्रांक विक्रेते येणाऱ्या काळात आझाद मैदान मुंबई येथे सहकुटुंब आंदोलन छेडणार आहे. अशी प्रतिक्रिया शासनमान्य मुद्रांक विक्रेते महासंघाचे कार्याध्यक्ष दिलीप देवरे यांनी यावेळी दिली.


स्टॅम्पऐवजी फ्रँकिंग मशिनचा वापर 


शंभर आणि पाचशे रुपयांचे स्टॅम्प बंद करण्यात येणार असून या स्टॅम्पऐवजी फ्रँकिंग मशिनचा (Franking machine) वापर करण्याचा विचार राज्य सरकारने सुरू केला आहे. त्यादृष्टीने सरकार पावले उचलत आहे. याबाबत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकच्या शासकीय विश्राम गृहात माहिती दिली होती. यावेळी विखे पाटलांनी बँक स्तरावर किंवा स्टॅम्प वेंडर यांच्याकडेच फ्रँकिंग मशिन कसे उपलब्ध करून देता येतील, याचा सध्या आढावा घेण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यामुळे भविष्यात शंभर आणि पाचशे रुपयांचे स्टॅम्प बंद होऊन फ्रँकिंग मशीनचाच वापर होईल, असेही त्यांनी सांगितले. सर्वसामान्यांना स्टॅम्प पेपरसाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागत होते. आता त्याची गरज भासणार नाही. याबाबत महसूल विभागाने प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Stamp Paper Scam : 30 हजार कोटींचा घोटाळा! कोण होता अब्दुल करीम तेलगी आणि काय होता स्टॅम्प पेपर घोटाळा?