एक्स्प्लोर

धाराशिवच्या रामलिंग अभयारण्यात वाघाचा मुक्त संचार, वनविभागाचे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन

बार्शी अभयारण्य धाराशिव जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्याला लागूनच असल्याने या भागात वाघ सहजपणे फिरत आहे

Dharashiv: यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेला एक वाघ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी अभयारण्य क्षेत्रात कॅमेरात कैद झाला आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वाघ पाणवठ्यावर आला असताना त्याचे दृश्य वन विभागाच्या कॅमेऱ्यात नोंदवले गेले. या घटनेमुळे धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील जंगल भागात वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. बार्शी अभयारण्य धाराशिव जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्याला लागूनच असल्याने या भागात वाघ सहजपणे फिरत आहे. दोन्ही अभयारण्य जवळ असल्याने वाघाच्या मुक्त संचाराला ही जागा अनुकूल ठरत आहे. वन विभागाचे पथक सध्या वाघाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवत आहे.

नागरिकांना सतर्कतेचं आवाहन

वन विभागाने स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “वाघ दिसल्यास त्वरित माहिती द्यावी, पण त्याला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी,” असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
 मराठवाड्यातील बालाघाटच्या डोंगर रांगातील रामलिंग अभयारण्यात वाघाचं दर्शन झालं. वनविभागाने बिबट्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले होते. त्यामध्ये वाघाची छबी कैद झाली. मराठवाड्यातील धाराशिवमध्ये वाघाचे दर्शन व्हायची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान हा वाघ पाचशे किलोमीटरचा प्रवास करत यवतमाळहून धाराशिवमध्ये आल्याची माहिती आहे. कॅमेरात कैद झालेला वाघ साधारण तीन वर्षाचा असून हा वाघ यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्याची T22 वाघिणीचा कब असल्याचं सांगितलं जात आहे.

यवतमाळ ते धाराशिव साधारणतः पाचशे किलोमीटरचा वाघाचा प्रवास

धाराशिव जिल्ह्यातील रामलिंग अभयारण्य आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी भागात या वाघाचा वावर असल्याचं दिसून आलं. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील वनविभागाच्या अधिकारी वाघाच्या शोधात आहेत. वाघाच्या पायाचे ठसे ट्रॅप कॅमेऱ्यातली चित्र यावरून वाघ कुठला दिशेने मार्गक्रमण करतोय याचा शोध घेतला जातोय. वाघ आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असला तरी तो विदर्भातील टिपेश्वर येथून आला. यवतमाळ आणि धाराशिव याचे अंतर पाहिलं तर साधारणता पाचशे किलोमीटरचा हा प्रवास आहे. त्यामध्ये जंगलाचा भाग कमी आहे. त्यामुळे सहाजिकच प्रश्न पडतोय वाघानं हा प्रवास कसा पूर्ण केला आणि त्याचा मार्ग कसा असेल, हा प्रश्न या निमित्याने विचराला जाऊ लागला आहे.  

यवतमाळचा हा वाघ धाराशिवच्या रामलिंगच्या जंगलात दाखल झाला. मात्र तिथे वातावरण त्याच्यासाठी पोषक आहे का? वनविभाग रामलिंगच्या जंगलातील या वाघाच रेस्क्यू करणार की वाघाच्या सोबतीसाठी वाघीण आणणार? हा प्रश्न होता, त्यावर वन्यजीव अधिकाऱ्यांनी सांगितलंय की, जिल्ह्यात वाघ दाखल झालाय या माहितीनं नागरिकांमध्येही भीतीच वातावरण आणि अफवा पसरल्या जातात. त्यावर नागरिकांनी एकट्याने फिरू नये, रात्री जाताना सोबत मोठा गाण्यांचा आवाज करत चालावं, अशी खबरदारी घेण्याचं वनाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. धाराशिवच्या जंगलात वाघ आढळला ही जशी सर्वसामान्यसाठी चिंतेची बातमी आहे. मात्र वन्य जीवाचा विचार केला तर ही समाधानाची गोष्ट आहे. रामलिंगच हे अभयारण्य वन्यजीवांसाठी समृद्ध आहे. याचंच हे चित्र आहे. कारण वाघ हा वन्यजीव साखळीतील शेवटचा घटक. हा वाघ आता किती दिवस या जंगलात राहणार माहित नाही, मात्र त्याच्या वास्तव्याच्या काळात  मनुष्य आणि वाघ यात संघर्ष होणार नाही त्यासाठी वनविभागाने योग्य पावल उचलणे गरजेचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या

आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
Dharashiv News: नशेसाठी खोकल्याच्या औषंधाचा वापर? धाराशिवच्या कळंब उपजिल्हा रुग्णालयातून चार महिन्यात तब्ब्ल 6840 बाटल्यांचा खप
नशेसाठी खोकल्याच्या औषंधाचा वापर? धाराशिवच्या कळंब उपजिल्हा रुग्णालयातून चार महिन्यात तब्ब्ल 6840 बाटल्यांचा खप
Dharashiv BJP: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस सुरूच! वरिष्ठांच्या स्ट्राइकनंतरही तरुण फळी मल्हार पाटलांच्या समर्थनार्थ; सोशल मीडियावरच्या 'ट्रेंड'ची राजकीय वर्तुळात चर्चा
धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत धुसपूस सुरूच! वरिष्ठांच्या स्ट्राइकनंतरही तरुण फळी मल्हार पाटलांच्या समर्थनार्थ; सोशल मीडियावरच्या 'ट्रेंड'ची राजकीय वर्तुळात चर्चा
मराठा समाजाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी थेट लक्ष घालावं; नरेंद्र पाटलांनी सांगितलं प्रमाणपत्राबाबत नेमकं काय घडतंय
मराठा समाजाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी थेट लक्ष घालावं; नरेंद्र पाटलांनी सांगितलं प्रमाणपत्राबाबत नेमकं काय घडतंय

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget