एक्स्प्लोर

Tuljapur: तुळजापुरात भाविकांचा वेळ वाचणार; सुलभ दर्शनासह दर्जेदार सुविधा देण्यासाठी 1 हजार कोटींचा विकास आराखडा

Tuljapur News: तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन अधिक सुलभ करण्यासाठी तसेच भाविकांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी नवीन बदल करण्यात येणार आहेत.

तुळजापूर:  तीर्थक्षेत्र तुळजापूर (Tuljapur) येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन अधिक सुलभ करण्यासाठी तसेच भाविकांच्या वेळेची बचत व्हावी, यासाठी नवीन बदल करण्यात येणार आहेत. शिर्डी, तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर भक्तांच्या सुविधेसाठी केंद्राच्या ‘प्रसाद’ योजनेतून ही कामे करण्यासाठी एक हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून या सुविधांनंतर दर्शनासाठी किती वेळ लागेल हे भक्तांना अगोदरच कळणार आहे. 

तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासाठी प्रसाद योजनेतून एक हजार कोटींचा नवा आराखडा तयार होत आहे.  तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन अधिक सुलभ करण्यासाठी तसेच भाविकांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी नवीन बदल करण्यात येणार आहेत. शिर्डी, तिरूपती देवस्थानच्या धर्तीवर बदल करण्यात येणार आहे. दर्शनासाठी आपला नंबर कधी येणार हे भक्तांना आधीच कळेल. त्यासाठी वाहन पार्किंग परिसरातच काऊंटर पास देण्यात येणार आहे. त्यावरील वेळेनुसार तासभर आधी मंदिर आवारात भाविकांना प्रवेश मिळणार आहे. दर्शन लाईन प्रकल्पातून टप्प्याटप्याने भाविकांना थेट मंदिरात सोडले जाणार आहे

महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजाभवानी मातेच्या शक्तीपीठाला विकासाची प्रतीक्षा आहे. अलीकडच्या काळात मंदिरात वाढलेली गर्दी आणि कमी पडत असलेल्या सुविधांच्या पार्श्वभूमीवर विकास आराखडा राबविण्याची गरज व्यक्त होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये तुळजापुरात झालेल्या प्रचारसभेत विकासाची ग्वाही दिली होती. नऊ वर्षानंतर यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या आहेत.

काय बदल होणार?

  • नव्या आराखड्यात वातानुकुलित सभागृहातून दर्शनाची रांग असणार आहे. 
  • एकूण 10 वातानुकुलित सभागृह आहेत. 
  • या सभागृहांची एक लाख भाविक क्षमता 
  • एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात पाठवून भाविकांना टप्प्याटप्प्याने मंदिरात सोडले जाईल
  • दर्शनाला किती वेळ लागेल हे आधीच कळणार आहे.
  •  वाहन पार्किंगच्या ठिकाणीच काऊंटर पास मिळेल. 
  • भाविकांना मंदिर परिसरात तासभर आधी प्रवेश मिळेल. 
  • मंदिर परिसरातील बांधकामात बदल होणार आहेत

मंदिर संस्थानने नवा विकास आराखड्याला प्रसाद योजनेतून या आराखड्याला निधी मिळणार आहे. सुरूवातीला एक हजार कोटींचा आराखडा राबविला जाईल. या आराखड्यात तुळजापुरात येणाऱ्या प्रत्येक प्रमुख मार्गावर शहराबाहेर म्हणजे नळदुर्ग रोड, हुडको, आराधवाडी भागात पार्किंग सुविधा असणार आहे. सध्याच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येतील. त्याचठिकाणी भाविकांचे साहित्य ठेवण्याची सोय करण्यात येणार आहे. 

तुळजापूर शहरालगत रामदरा परिसरात उद्यान साकारले जाणार आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येक प्रमुख मार्गावर आता दगडी कमानी उभारण्यात येणार आहेत. शासनाकडे प्रस्ताव पाठवून मान्यता आल्यानंतर गरजेनुसार बदल केले जातील. यापूर्वी 325 कोटींचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबविण्यात आला होता. यातून तुळजापूर शहराचा पुरेसा विकास झाला नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pandharpur News: विठ्ठलभक्तांसाठी खुशखबर; गुढी पाडव्यापासून देवाच्या तुळशी अर्चन पूजेस सुरुवात, मंदिर समिती अध्यक्षांची माहिती

मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Pratap Sarnaik on Eknath Shinde: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, स्वातंत्र्यदिनी प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले, 'भविष्यात शिवसेनेचे आमदार अन् खासदार...'
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, स्वातंत्र्यदिनी प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली इच्छा; म्हणाले, 'भविष्यात शिवसेनेचे आमदार अन् खासदार...'
Kailas Patil on Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक म्हणाले, कैलास पाटील हेच ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील; आता कैलास पाटलांचं थेट आव्हान, म्हणाले...
प्रताप सरनाईक म्हणाले, कैलास पाटील हेच ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील; आता कैलास पाटलांचं थेट आव्हान, म्हणाले...
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget