एक्स्प्लोर

मोठी बातमी! महादेव जानकरांना तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले

Mahadev Jankar : यावेळी जानकर आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची देखील झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे, गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेवुन महादेव जानकर यांना परतावे लागले आहे. 

धाराशिव : रासप अध्यक्ष महादेव जानकरांना (Mahadev Jankar) तुळजा भवानी मंदिरात जाण्यापासून अडवण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. धाराशिवचे माजी पालकमंत्री तथा माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर दर्शनासाठी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात गेले होते. मात्र, यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवत गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले. यावेळी जानकर आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची देखील झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे, गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेवुन महादेव जानकर यांना परतावे लागले आहे. 

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जनस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. दरम्यान ही यात्रा राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून जात आहे. तर हीच जनस्वराज्य यात्रा धाराशिव जिल्ह्यात पोहचली आहे. यावेळी महादेव जानकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले होते. मात्र, दर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून त्यांना सुरक्षारक्षकांनी रोखले. तसेच आतमध्ये जाता येणार नसल्याचे जानकर यांना सांगितले. यावरून जानकर आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची देखील झाली. मात्र, सुरक्षारक्षकांनी नाही म्हणजे नाहीच अशी भूमिका घेतल्याने जानकर यांना गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेऊन निघावे लागले. 

जानकर यांच्याकडून नाराजी व्यक्त...

दरम्यान, या सर्व प्रकरणावर महादेव जानकर यांची प्रतिक्रीया आली असून, त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही जनतेचे सेवक आहोत. मंदिर प्रशासनाने माणसाचा प्रोटोकॉल पाहून त्यांना थांबवले पाहिजे. याच विचार प्रशासनाने करायला पाहिजे. याबाबत मी जिल्हाधिकारी यांना बोलणार आहे. असली मगरूरी आम्ही चालू देणार नाही. आम्ही याच राज्यातील असून, आमची देखील देवी आहे. आज चांगला दिवस असल्याने आम्ही देखील वाद घातला नाही आणि बाहेरून पूजा केली. असे करणे योग्य नसून, मोठ्या माणसाचा मान ठेवला पाहिजे. त्यामुळे माणसे पाहून नीट वागले पाहिजे. सत्ता येत असते आणि जात असते. उद्या आम्ही देखील सत्तेत असणार आहे. त्यावेळी हे कुठे जाणार आहे, परत पाया पडणार. त्यामुळे सुरक्षारक्षक यांना दोष देणार नाही, पण यांना कोणी आदेश दिला त्यांना कसे बाजूला ठेवायचं याची आम्ही काळजी घेऊ, असे जानकर म्हणाले. 

संभाजीराजेंना देखील रोखले होते....

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी असाच प्रकार संभाजीराजे यांच्यासोबत देखील घडला होता. उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना कुलस्वामामिनी तुळजाभवानी मंदिरात संभाजीराजे गेले असता, त्यांना देखील गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार घडला होता. यावरून मंदिर प्रशासनावर जोरदार टीका देखील झाली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Tuljapur : तुळजापूरसाठी राज्य सरकारकडून 1385 कोटींचा निधी; कोणती कामे होऊ शकतील?

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला आली जाग, धाराशिवच्या वृद्ध महिलेला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा
ABP माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला आली जाग, धाराशिवच्या वृद्ध महिलेला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा
धाराशिवच्या वृद्ध महिलेची पालकमंत्र्यांनी घेतली दखल, अन्नधान्य मिळणार, घरही दुरुस्त होणार, मंत्री सरनाईकांनी दिली माहिती
धाराशिवच्या वृद्ध महिलेची पालकमंत्र्यांनी घेतली दखल, अन्नधान्य मिळणार, घरही दुरुस्त होणार, मंत्री सरनाईकांनी दिली माहिती
Omraje Nimbalkar On Loksabha Election 2029: चॅलेंज स्वीकारलं, 2029 ला किती मतांनी जिंकणार?; ओमराजे निंबाळकरांनी जाहीर करुन टाकलं, धाराशिवमध्ये जबरदस्त भाषण!
चॅलेंज स्वीकारलं, 2029 ला किती मतांनी जिंकणार?; ओमराजे निंबाळकरांनी जाहीर करुन टाकलं, धाराशिवमध्ये जबरदस्त भाषण!
Kailas Patil on Sanjay Shirsat: आम्ही थांबवलं नसतं तर त्यांचं रामनाम सत्य झालं असतं, संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर कैलास पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले...
आम्ही थांबवलं नसतं तर त्यांचं रामनाम सत्य झालं असतं, संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर कैलास पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Embed widget