एक्स्प्लोर

'तान्हाजी' चित्रपट करमुक्त करा, देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तान्हाजी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा करमुक्त करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. उत्तर प्रदेशमध्ये हा सिनेमा करमुक्त झाला आहे. आता तो महाराष्ट्रातही करमुक्त व्हावा अशी मागणी होत आहे.

मुंबई : स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक पत्रातून केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, तानाजी मालुसरे हे एक वीर योद्धा होते. त्यांचे शौर्य नव्या पिढीसमोर यावे आणि त्यांच्या वीरतेच्या गाथा नव्या पिढीला कळाव्या, हा चित्रपट अधिकाधिक लोकांनी पहावा, यासाठी तो करमुक्त करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासात कोंढाणा किल्ला सर करण्याचा तानाजी मालुसरे यांचा प्रसंग ऐतिहासिक आणि विलक्षण आहे. शिवछत्रपतींचे विश्वासू सहयोगी म्हणून तानाजी मालुसरे यांनी जिवाची बाजी लावून हा महत्त्वाचा गड सर केला आणि स्वराज्यासाठी बलिदान दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अधिकाधिक शिवभक्त आणि मराठीजनांपर्यंत हा चित्रपट पोहोचणे आणि या ऐतिहासिक स्मृतींचे जतन होणे अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच त्यांच्या शौर्याचे स्मरण होण्यासाठी हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी विनंती या पत्रातून मी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने करीत आहे. अन्य राज्यांनी अशाप्रकारे निर्णय घेतला असल्याने तानाजींचे कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्रात हा निर्णय त्वरेने होणे गरजेचे आहे, असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे. याआधी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली होती. युध्‍दाला सामोरे जाणारे तानाजी आमच्‍या श्रेष्‍ठ मराठी संस्‍कृतीचा मानबिंदु आहे. या चित्रपटाला रसिकप्रेक्षकांची प्रचंड पसंती सुध्‍दा मिळत आहे. या चित्रपटाला करमुक्‍त करुन शासनाने या वीर योध्‍द्याला मानवंदना द्यावी अशी मागणी मुनगंटीवार यांनी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्‍याकडे केली होती. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने राज्यात तानाजी चित्रपट करमुक्त केला आहे. तीन दिवसांतच चित्रपटाने तब्बल 61.75  कोटी रुपयांची कमाई केली आहे. जर चित्रपट असाच पुढेही सुपरहिट होत राहिला, तर यावर्षीचा तानाजी हा चित्रपट पहिला ब्लॉकबस्टर असेल, असे तज्ञांनी म्हटले आहे.  'यूपीत करमुक्त केलेला तानाजी चित्रपट तुम्हीही अवश्य बघा. मलाही आनंद वाटेल', असे आवाहनही देवगणने सोशल मीडियावर योगी आदित्यनाथ यांना केले आहे. संबंधित बातम्या  'तान्हाजी' सिनेमाचं तिकीट दाखवा आणि राजापूर कोंड्ये ते मुंबई प्रवास मोफत करा  बेळगावात 'तान्हाजी' चित्रपटाला कर्नाटक नवनिर्माण सेनेचा विरोध, शो बंद पाडण्याचा प्रयत्न  Tanhaji Movie Review | पुरेपूर लिबर्टी घेऊन केलेली शौर्यगाथा   Tanhaji I 'तान्हाजी' चित्रपटातील 'त्या' दृश्यावर मालुसरे यांच्या वंशजांचा आक्षेप

महत्त्वाच्या बातम्या

IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
NZ vs IND ODI Squad : भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Embed widget