पंचवटीत आक्षेपार्ह मजकुराच्या पत्रकाचे वाटप, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नाशिकच्या घटनेची दखल, म्हणाले...
Devendra Fadnavis on Nashik Incident : पंचवटीच्या राजवाडा परिसरात हिंदू युवा वाहिनीच्या नावाच्या लेटरहेडवर अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांविषयी आक्षेपार्ह मजकुराची पत्रके टाकण्यात आली होती.
![पंचवटीत आक्षेपार्ह मजकुराच्या पत्रकाचे वाटप, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नाशिकच्या घटनेची दखल, म्हणाले... Devendra Fadnavis on Nashik incident Distribution of leaflets with offensive content in Panchavati Kalaram Mandir Maharashtra Marathi News पंचवटीत आक्षेपार्ह मजकुराच्या पत्रकाचे वाटप, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नाशिकच्या घटनेची दखल, म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/699d4b0dcd341428582af46fc03fe88b1719127916451923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Devendra Fadnavis : नाशिकमधील (Nashik) पंचवटीच्या (Panchavati) राजवाडा (Rajwada) परिसरात हिंदू युवा वाहिनीच्या (Hindu Yuva Vahini) नावाच्या लेटरहेडवर अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांविषयी आक्षेपार्ह मजकुराची छापलेली पत्रके घराबाहेर टाकण्यात आली होती. यानंतर पंचवटी परिसरात शनिवारी दिवसभर तणाव निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने पंचवटी पोलिसांनी (Panchavati Police) तपासाची चक्र फिरवित संशयित आरोपी अमोल चंद्रकांत सोनवणे यास ताब्यात घेतले. आता या प्रकरणाची दखल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे. काळाराम मंदिराच्या अवतीभवती राहणाऱ्या लोकांना धमकीचा पत्र प्रकाशित करण्यात आलं होतं. ज्याने ते प्रकाशित केलं होतं, त्याला अटक झाली आहे. त्याने दुसऱ्या एका व्यक्तीशी जुनं वैमनस्य काढण्यासाठी दलित समाजाला धमकी देणारा, निळे झेंडे लावू नका असं मजकूर असलेला पत्रक प्रकाशित केला होता.
चार मोबाईल आणि दोन लॅपटॉप जप्त
ज्याने हे पत्र प्रकाशित केलंय, तोही दलित समाजाचा आहे. काहीतरी वेगळ्याच हेतूने त्याने हे पत्रक काढलं आहे. पोलीस या मागची कारण काय आहेत ते शोधून काढत आहे. ज्याला अटक केली त्याच्याकडून चार मोबाईल आणि दोन लॅपटॉप मिळाले आहे. त्यामुळे अन्य कोणी त्याच्या पाठीशी आहेत का?? दंगल घडवण्यासाठी हे पत्रक काढण्यात आले होते का?? याचा शोध पोलीस घेत आहे.
पूर्व वैमनस्यातून हे पत्रक काढल्याची माहिती
सध्या तरी प्राथमिक दृष्ट्या एका व्यक्तीशी पूर्व वैमनस्यातून हे पत्रक काढण्याचे दिसत आहे. मात्र अटक झालेल्या व्यक्तीकडे ज्या वस्तू सापडल्या आहे, त्यामुळे त्याचा हेतू वेगळा होता का? याचाही शोध घेतला जात आहे. यापुढे देखील, असे प्रयत्न होऊ शकतात. पत्र काढायचं आणि समाज माध्यमावर ते पोस्ट करायचे आणि समाजात गैरसमज निर्माण करून दंगलसदृश्य स्थिती निर्माण करायची, असे यापुढेही होऊ शकतं. म्हणून गृहविभाग यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे.
...तर समाजात तेढ निर्माण होईल
पोलीस महासंचालक आणि एसआयडीला वस्तुस्थिती सांगितली आहे. काही राजकीय नेत्यांनी काल ते पत्र ट्विट केलंय. माझी त्यांना विनंती आहे, शहानिशा न करता, वस्तूस्थिती न तपासता समाज माध्यमावर पोस्ट केली तर समाजात तेढ निर्माण होईल. कालच्या प्रकरणात सर्व सत्य बाहेर आले, असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)