एक्स्प्लोर
प्रवाशांचं सोंग घेऊन खासगी टॅक्सीचालकांना लुटणारी टोळी जेरबंद

ठाणे : प्रवाशांचं सोंग घेऊन ओला, उबेरसारख्या खासगी टॅक्सी चालकांना लुटणाऱ्या टोळीला ठाणे पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील आरोपींमध्ये दोनजण सराईत गुन्हेगार असून, दोन कॉलेज विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही टोळी प्रवाशांचं सोंग घेऊन टॅक्सीत बसत. टॅक्सी निर्जन स्थळी येताच चाकुचा धाक दाखवून चालकाकडील किमती ऐवज लुटून पळ काढत. काही दिवसांपूर्वी या चारही आरोपींनी विमलेश गुप्ता नावाच्या टॅक्सीचालकावर हल्ला करून पोबारा केला होता. त्याप्रकरणी ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवत आरोपींना अटक केली. या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय उगवेकरवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या चौघांना अटक करुन पोलिसांनी न्यायालया समोर उभे केले असता, न्यायालयाने त्या चौघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर























