एक्स्प्लोर

नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता बसव राजूवर पोलिसांकडून तडकाफडकी अंत्यसंस्कार? न्यायालयाच्या आदेशानंतरही मृतदेह न दिल्याचा कुटुंबियांचा आरोप

Chhattisgarh Naxal: न्यायालयाच्या आदेशानंतरही कुटुंबीयांना मृतदेह न देता अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप बसवराजूच्या कुटुंबीय आणि सामाजिक संघटनांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

गडचिरोली : चार दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या (Chhattisgarh Naxal) चकमकीत ठार झालेला नक्षलवादी (Gadchiroli Naxal) नेता बसवराजू सह काही नक्षलवाद्यांचे मृतदेहांवर छत्तीसगड पोलिसांनी सोमवारी सायंकाळी नारायणपूर (Narayanapur Naxal Encounter) मध्ये अंत्यसंस्कार केलेत. न्यायालयाच्या आदेशानंतरही कुटुंबीयांना मृतदेह न देता अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीय आणि सामाजिक संघटनांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

छत्तीसगड- महाराष्ट्र सीमेवर चार दिवसांपूर्वी  झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता गंगना उर्फ बसवराजूचा मृत्यू झाला होता. हा मृतदेह घेण्यासाठी बसवराजूचे काही नातेवाईक आणि मोठे भाऊ नारायणपूरला गेले होते. मात्र छत्तीसगडच्या सुरक्षा दलांनी त्यांना मृतदेह दिले नाही. त्यांच्यासोबत वेगळ्या पद्धतीची वागणूक देण्यात आल्याचा आरोप करत कुटुंबियांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर मृतदेह घेण्यासाठी छत्तीसगड पोलीस प्रशासनाकडे जाण्याची सूचना केली होती.

अंत्यसंस्कार करून मानवी हक्कांचा भंग- बेला भाटिया

दरम्यान, सोमवारी संध्याकाळी बसवराजुसह तब्बल आठ नक्षलवाद्यांवर नारायणपूर येथील स्थानिक आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन न करता पोलिसांकडून या आठही नक्षलवाद्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यात आंध्र प्रदेशातील दोन, तेलंगणातील तीन आणि छत्तीसगड येथील तीन अशा आठ नक्षलवाद्यांवर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना न देता अंत्यसंस्कार करून मानवी हक्कांचा भंग करण्यात आल्याच आरोप सामाजिक कार्यकर्त्या बेला भाटिया यांनी केला आहे.

पंतप्रधानांच्या 'मन की बात' मध्ये काटेझरीतील बससेवेचा गौरवपूर्ण उल्लेख 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' या आकाशवाणीवरील संवाद कार्यक्रमात  गडचिरोली जिल्ह्यातील काटेझरी गावाचा विशेष उल्लेख करत, माओवादग्रस्त भागांमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांवर प्रकाश टाकला. काटेझरी गावात २३ मार्च २०२५ रोजी पहिल्यांदाच बस पोहोचल्याच्या घटनेचे पंतप्रधानांनी कौतुक केले, आणि या घटनेने त्या भागातील विकासाची गाथा अधोरेखित केली. पंतप्रधानांनी सांगितले की, "मी तुम्हाला, जिथे पहिल्यांदाच एक बस पोहोचली, अशा एका गावाबद्दल आज सांगू इच्छितो, त्या दिवसाची त्या गावातले लोक अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होते.

"त्यांनी पुढे म्हटले की, जेव्हा गावात पहिल्यांदा बस आली, तेव्हा लोकांनी ढोल-नगारे वाजवून तिचं स्वागत केलं. बस पाहून लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. काटेझरी गावात पक्की सडक असूनही, लोकांना वाहतुकीची गरज असूनही यापूर्वी कधीही तिथे बस सेवा सुरू झाली नव्हती. याचे मुख्य कारण म्हणजे हा गाव माओवादी हिंसाचारानं प्रभावित होता. काटेझरीमध्ये झालेल्या या बदलाचा आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आता या भागातील परिस्थिती वेगाने सामान्य होत आहे. माओवादाविरुद्धच्या सामूहिक लढाईमुळे आता अशा दुर्गम आणि माओवादग्रस्त भागांपर्यंतही मूलभूत सोयी-सुविधा पोहोचू लागल्या आहेत, हे या घटनेतून सिद्ध होते. पंतप्रधानांच्या 'मन की बात' मधील या उल्लेखाने गडचिरोली जिल्ह्यातील विकासात्मक कामांना, विशेषतः नक्षलवाद विरोधी मोहिमेला आणि त्यातून सामान्य नागरिकांना मिळत असलेल्या लाभांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'ऑडिशन नाही, कुंडली पाहून कास्टिंग!', प्रसिद्ध अभिनेत्रीकडून TV इंडस्ट्रीची पोलखोल; सगळंच सांगितलं
'ऑडिशन नाही, कुंडली पाहून कास्टिंग!', प्रसिद्ध अभिनेत्रीकडून TV इंडस्ट्रीची पोलखोल; सगळंच सांगितलं
Latur ZP Election : लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'

व्हिडीओ

Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur ZP Election : लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाची नकारघंटा, अमेरिकेच्या अडचणी वाढल्या
होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाचा नकार,ट्रम्प यांना मोठा धक्का
Naigaon BDD Chawl Photo: 23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Embed widget