एक्स्प्लोर

मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरात तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये भाजपा आमदाराचं नाव; धमकी दिल्याचा आरोप!

छत्रपती संभाजीनगरत एका तरुणाने आत्महत्या केली असून त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजपाच्या आमदाराचे नाव असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे जयदत्त सुरभेये नावाच्या तरुणाने आत्महत्या केली असून त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजपाचे आमदार नारायण कुचे यांचे नाव आहे. कुचे यांच्या धमक्यांमुळेच आत्महत्या करत असल्याचा उल्लेख या सुसाईड नोटमध्ये असल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव जयदत्त सुरभेये असे आहे. या तरुणाने आमदार नारायण कुचे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोपक जातोय. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये भाजपा आमदार नारायण कुचेंच्या धमक्यांमुळे आत्महत्या करत असल्याच उल्लेख करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जयदत्त या तरुणाने कुचे यांच्या जय भवानी बँकेकडून दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सुसाईड नोटमध्ये नारायण कुचे यांचे नाव असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

नारायण कुचे आरोपांवर काय म्हणाले?

आत्महत्या केलेल्या तरुणाला मी आयुष्यात कधीही बोललेलो नाही. मी त्याला आयुष्यात कधीही बोललेलो नाही. मी त्याला प्रत्यक्षात कधीही भेटलेलो नाही. आमचा फोनद्वारेही संपर्क झालेला नाही. मृत तरुणाचा आणि माझा व्यवहाराचा कधीही संबंध आलेला नाही. मृत तरुण माझा नातेवाईकच आहे. मृत तरुणाची बहीण माझी सून आहे. मृत तरुणाचा मेहुणा माझ्या पतसंस्थेत नोकरीला आहे. त्यांचं नाव मोतीलाल कुचे आहे. त्यामुळे मृत व्यक्ती माझा जवळचा नातेवाईक आहे, असे नारायण कुचे यांनी स्पष्ट केले.

मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय

सध्या चर्चेत असलेली चिठ्ठी ही दुसऱ्याच व्यक्तीने पोलिसांना दाखवलेली आहे. म्हणून राजकीय द्वेषापोटी मला कोणी बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे का? असा मला संशय आला आहे. त्यामुळेच मी स्वत: सीपी साहेबांना या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे. 

या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे

मी फोनद्वारे धमकी दिली, असा आरोप केला जात आहे. मी धमकी देणारा माणूस नाही. मृत तरुणावर लाख ते दीड लाख रुपयांचे कर्ज आहे. या कर्जाचे हफ्ते क्लियर आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच मी संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना भेटलो आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. ही चिठ्ठी मृत तरुणानेच लिहिलेली आहे का? याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी नारायण कुचे यांनी केली.  

हेही वाचा :

" सॉरी मम्मी पप्पा”, UPSC करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थीनीची दिल्लीत आत्महत्या

Buldhana : भाजप आमदार श्वेता महालेंच्या बॉडीगार्डची आत्महत्या, स्वतःवर गोळ्या झाडून संपवलं

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, सरकार लाईनवर आलं नाही तर तेही बदलू; मराठी भूमीतून अभिजीत दिपकेचा इशारा
आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, सरकार लाईनवर आलं नाही तर तेही बदलू; मराठी भूमीतून अभिजीत दिपकेचा इशारा
Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा घेतला बळी; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा बळी घेतला; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
Crime news: छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime: राजकारणातून संपवण्यासाठी अघोरी मंत्रविधी, छत्रपती संभाजीनगर हादरलं, झाडाला फोटो टांगून जादूटोण्याचे फोटो व्हायरल
राजकारणातून संपवण्यासाठी अघोरी मंत्रविधी, छत्रपती संभाजीनगर हादरलं, झाडाला फोटो टांगून जादूटोण्याचे फोटो व्हायरल

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget