एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar News: शहरात पाणी नाही पण बर्थडे जोरात; संभाजीनगर आयुक्तांच्या शाही वाढदिवसाची जोरदार चर्चा

Chhatrapati Sambhaji Nagar : विशेष म्हणजे यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून 2 लाख 43 हजारांची वर्गणी जमा केल्याची देखील चर्चा आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News: अधिकाऱ्यांचा शाही थाट अनेकदा पाहायला मिळतो. अशा शाही थाटमुळे अनेक अधिकाऱ्यांची अनेकदा चर्चा देखील पाहायला मिळाला आहे. आता अशीच काही चर्चा छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) मनपा आयुक्त तथा प्र्शासाक जी श्रीकांत यांची पाहायला मिळत आहे. कारण छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी कार्यालयात सोमवारी जी श्रीकांत यांचा शाही पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून 2 लाख 43 हजारांची वर्गणी जमा केल्याची देखील चर्चा आहे. एकीकडे शहरातील अनेक भागात आठ ते दहा दिवसाला पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे असे असतांना आयुक्तांनी असा शाही वाढदिवस साजरा करणे कितपत योग्य आहे अशी प्रतिकिया उमटत आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांचा सोमवारी वाढदिवस होता. आता आयुक्तांचाच वाढदिवस आहे म्हटल्यावर अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले. यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयात रेड कार्पेट अथरण्यात आले, विशेष म्हणजे त्यावर गुलाबाच्या फुलांचा सडा टाकण्यात आला.तसेच शानदार फेटे, सुंदर रांगोळी काढण्यात आली. तर जेवणासाठी उत्तम पदार्थ तयार करण्यात आले होते. एवढच काय तर आयुक्तांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. हा सगळा थाट आयुक्तांच्या वाढदिवसानिमित्ताने पाहायला मिळाल्याने अनेकांना धक्काच बसला. शहरात अनेक ठिकाणी विकास कामं ठप्प पडली आहे, शहरातील अनेक भागात आठ ते दहा दिवसाला पाणी मिळत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत लाखो रुपयांची उधळपट्टी करत आयुक्तांनी शाही वाढदिवस साजरा करणं कितपत योग्य आहे अशी चर्चा आता शहरभरात पाहायला मिळते.

होर्डिंग्ज लावण्यासाठी एजन्सी अन्  2 लाख 43 हजारांची वर्गणी 

छत्रपती संभाजीनगरचे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. तर आयुक्तांना शुभेच्छा देण्यासाठी लातूरच्या एका एजन्सीने शहरात होर्डिंग्ज लावल्याचे देखील बोलले जात आहे. सोबतच महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून 2 लाख 43 हजारांची वर्गणी जमा करून आयुक्तांचा हा शाही वाढदिवस साजरा केला असल्याचं बोललं जात आहे.

आयुक्तांचे कार्यालय ही सजवलं

मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा वाढदिवस असल्याने स्मार्ट सिटी आणि महानगरपालिकेची सर्वच यंत्रणा जणू कामाला लागली होती. स्मार्ट सिटी कार्यालयात रांगोळी काढण्यात आली. आयुक्तांसाठी विशेष केकची सोय करण्यात आली. एवढंच काय तर आयुक्त बसतात त्या कार्यालयात फुगे लावण्यात आले, टेबलावर बुके ठेवून कार्यालय सजवण्यात आले. त्यामुळे मनपा आयुक्त यांच्या वाढदिवसाची शहरात दिवसभर चर्चा होती.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Harshvardhan Jadhav : बीआरएसकडून संभाजीनगरात हर्षवर्धन जाधवांना लोकसभेची उमेदवारी?, बॅनर झळकल्याने चर्चेला उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील पहिला नराधम सापडला? महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील पहिला नराधम सापडला? महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
Jayant Patil on Mahayuti : बुडत्याला काडीचा आधार! अवघ्या काही मिनिटांत 86 निर्णय घेतले ही त्रिकूट सरकारची अगतिकता; जयंत पाटलांचा हल्लाबोल
बुडत्याला काडीचा आधार! अवघ्या काही मिनिटांत 86 निर्णय घेतले ही त्रिकूट सरकारची अगतिकता; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Abu Salem : कुख्यात गँगस्टर अबू सालेमची कारागृहात भेट घेणारे दोघे एटीएसच्या ताब्यात, तब्बल 20 तासांपासून चौकशी, नाशिकमध्ये खळबळ
कुख्यात गँगस्टर अबू सालेमची कारागृहात भेट घेणारे दोघे एटीएसच्या ताब्यात, तब्बल 20 तासांपासून चौकशी
Abhijit Patil : पहिल्यांदा पुण्यात भेट झाल्यानंतर आता थेट 'सिल्व्हर ओक'वर! माढासाठी अभिजित पाटील दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला
पहिल्यांदा पुण्यात भेट झाल्यानंतर आता थेट 'सिल्व्हर ओक'वर! माढासाठी अभिजित पाटील दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : सगळे मिस्टर फॉर्टी परसेंट आहेत; राज्याला लुटा आणि दिल्लीत पाठवाAjit Pawar : अजित पवारांची पत्रकार परिषद; मोठी घोषणा होण्याची शक्यताPrakash Ambedkar : शरद पवार , काँग्रेसच्या मनात असुरक्षिततेची भावना - प्रकाश आंबेडकरNavi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर धावपट्टीची चाचणी; अनेक नेते उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील पहिला नराधम सापडला? महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील पहिला नराधम सापडला? महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
Jayant Patil on Mahayuti : बुडत्याला काडीचा आधार! अवघ्या काही मिनिटांत 86 निर्णय घेतले ही त्रिकूट सरकारची अगतिकता; जयंत पाटलांचा हल्लाबोल
बुडत्याला काडीचा आधार! अवघ्या काही मिनिटांत 86 निर्णय घेतले ही त्रिकूट सरकारची अगतिकता; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Abu Salem : कुख्यात गँगस्टर अबू सालेमची कारागृहात भेट घेणारे दोघे एटीएसच्या ताब्यात, तब्बल 20 तासांपासून चौकशी, नाशिकमध्ये खळबळ
कुख्यात गँगस्टर अबू सालेमची कारागृहात भेट घेणारे दोघे एटीएसच्या ताब्यात, तब्बल 20 तासांपासून चौकशी
Abhijit Patil : पहिल्यांदा पुण्यात भेट झाल्यानंतर आता थेट 'सिल्व्हर ओक'वर! माढासाठी अभिजित पाटील दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला
पहिल्यांदा पुण्यात भेट झाल्यानंतर आता थेट 'सिल्व्हर ओक'वर! माढासाठी अभिजित पाटील दुसऱ्यांदा शरद पवारांच्या भेटीला
Pankaja Munde Beed: भगवान गडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी, धनुभाऊ पहिल्यांदाच पंकजाताईंसोबत व्यासपीठावर
भगवान गडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी, धनुभाऊ पहिल्यांदाच पंकजाताईंसोबत व्यासपीठावर
Kagal Vidhan Sabha : कागलमध्ये उमेदवारीवरून मंडलिक पिता-पुत्रांमध्ये मत मतांतरे; आता संजय मंडलिक काय म्हणाले?
कागलमध्ये उमेदवारीवरून मंडलिक पिता-पुत्रांमध्ये मत मतांतरे; आता संजय मंडलिक काय म्हणाले?
मोठी बातमी : नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये सरावादरम्यान ब्लास्ट, दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू
मोठी बातमी : नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये सरावादरम्यान ब्लास्ट, दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंचा मविआला पहिला धक्का, पाच टर्म खासदारकी गाजवणाऱ्या नेत्याच्या मुलाचा काँग्रेसला रामराम
विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंचा मविआला पहिला धक्का, पाच टर्म खासदारकी गाजवणाऱ्या नेत्याच्या मुलाचा काँग्रेसला रामराम
Embed widget