एक्स्प्लोर

मोठी बातमी! वन विभागाच्या परीक्षेत पास करून देण्याचा दावा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; औरंगाबाद पोलिसांनी टोळीला ठोकल्या बेड्या

Vanrakshak Bharti Paper Scam : औरंगाबाद शहर पोलीस दलाच्या एमआयडीसी सिडको पोलिसांनी वन विभागाच्या परीक्षेतील घोटाळा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

Vanrakshak Bharti Paper Scam : मागील काही दिवसांपासून वन विभागाच्या परीक्षेत (Vanrakshak Bharti Paper) गैरप्रकार होत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात याचे मोठं रॅकेट असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहर पोलीस दलाच्या एमआयडीसी सिडको पोलिसांनी वन विभागाच्या परीक्षेतील घोटाळा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. वन विभागाच्या परीक्षेत पास करुन देण्यासाठी पाच ते दहा लाख रुपये घेणाऱ्या या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. तर, या प्रकरणी एकूण चार लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल धनराज निचड (वय 30 वर्ष, व्यवसाय - शिक्षण, रा.मु.पो. खंदाळा, ता. आकोट जि. अकोला), आण्णाजी धनाजी काकडे (वय-29 वर्ष व्यवसाय-संत बाळुमामा ऍकडमी संचालक, रा.मुक्काम पिंपळवाडी, पोस्ट वडुज, ता. खटाव, जि.सातारा), अनिल भरत कांबळे (रा. जिल्हा सातारा), संदिप भुतेकर (रा. औरंगाबाद) असे या आरोपींचे नावं आहेत. 

वन विभागाच्या परीक्षेत उमेदवारांना पास करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले जात असल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे, पोलिसांनी या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार छापेमारी करुन चौकशी केली असता हे रॅकेट समोर आले आहे. यातील चारही आरोपींनी संगनमत करुन परीक्षार्थींना वनरक्षक पदाची शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांचेकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांची मागणी केली. यासाठी विद्यार्थ्यांकडून मूळ कागदपत्रे ताब्यात घेऊन, त्यांच्याकडून चेक सुद्धा घेतल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. त्यामुळे, पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपी संदीप भुतेकर याच्या नावाने पाच लाखाचा चेक, अमोल धनराज निचड याच्या नावाने पाच लाख रुपयांचा दोन चेक मिळून आले आहेत. तर विद्यार्थ्यांचे दहावी सनद, मार्कशिट, डोमिसाईल, नॅशनॅलिटी प्रमाणपत्र व कास्ट प्रमाणपत्र सापडले आहे. या सर्व आरोपींकडून मुलांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. तसेच यासाठी मोठी रक्कम देखील घेतली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे. 

चार दिवसांतील चौथी कारवाई... 

वन विभागाच्या परीक्षेतील गैरप्रकाराच्या घटना सतत औरंगाबाद शहरात घडताना पाहायला मिळत आहे. कारण मागील चार दिवसांत ही मोठी घटना समोर आली आहे. कारण, यापूर्वी औरंगाबादमध्ये वनरक्षक भरती परीक्षेत हायटेक कॉपीचे तीन प्रकार समोर आले आहेत. सुराणानगर आणि चिकलठाणा एमआयडीसी आणि वाळूज येथील परीक्षा केंद्रावर तीन परीक्षार्थींना ब्ल्यू टूथ, मोबाईल, मख्खी हेडफोन, मास्टर कार्ड रिडरसहीत ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणी सचिन अंबादास राठोड, नितीन संजय बहुरे (19, रा. बेंबळ्याची वाडी, घोडेगाव, जि. औरंगाबाद) आणि सतीश मदनसिंग जारवाल (28, रा. टाकळेवाडी, ता. गंगापूर, औरंगाबाद) अशी परीक्षार्थींची आणि बाहेरून मदत करणारा करण चतरसिंग गुसिंगे यांचा आरोपींमध्ये समावेश होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Vanrakshak Bharti Paper : परीक्षा आहे की लपाछुपीचा खेळ! औरंगाबादेत वनरक्षक भरती परीक्षेत हायटेक कॉपीच्या तीन घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6.30 AM  : 4 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 04 Dec 2024 : ABP MajhaUddhav Thackeray On BMC Election : महापालिकेसाठी ठाकरेंची हिंदुत्वाची 'मशाल' Special ReportJankar vs Satpute  : हट्ट सोडला, संघर्ष टळला; Karadwadiत घटनात्मक पेच थोडक्यात टळला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Embed widget