(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दुर्देवी घटना! पाण्याच्या रांजणात बुडून 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
Chhatrapati Sambhaji Nagar : आजी-आजोबा व नातेवाइकांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. शोध सुरू असताना सायंकाळच्या सुमारास वेदिका घराजवळील पाण्याच्या रांजणात आढळून आली.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शफेपूर येथे एक दुर्देवी घटना समोर आली असून, पाण्याच्या रांजणात बुडून एका तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. वेदिका काशिनाथ हरणकाळ असे मयत चिमुकलीचे नाव आहे. तर, या घटनेनंतर हरणकाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आला आहे.
अधिक माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील शफेपूर येथील काशीनाथ हरणकाळ हे मजुरीचे काम करतात. रविवारी ते आपल्या पत्नीसह मजुरीच्या कामाला गेले होते. त्यामुळे त्यांनी आपली तीन वर्षांची मुलगी वेदिकाला आपल्या सासू-सासऱ्याकडे नेऊन सोडले होते. परंतु, अचानक दुपारपासून वेदिका कुठे दिसत नव्हती. त्यामुळे, आजी-आजोबा व नातेवाइकांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. शोध सुरू असताना सायंकाळच्या सुमारास वेदिका घराजवळील पाण्याच्या रांजणात आढळून आली.
डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
सर्वत्र शोध घेत असतांना वेदिका घराजवळील पाण्याच्या रांजणात आढळून आली. त्यामुळे नातेवाइकांनी वेदिकाला तत्काळ पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरी यांनी तपासून वेदिकाला मृत घोषित केले. वेदिकाचा रात्री उशिराने दफनविधी करण्यात आला. तिच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेने हरणकाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आला आहे.
खेळता-खेळता रांजणात पडली...
काशीनाथ हरणकाळ आणि त्यांच्या पत्नी कामाला जाणार असल्याने त्यांनी आपल्या मुलीला जवळ राहणाऱ्या काशीनाथ यांच्या सासू-सासऱ्याकडे नेऊन सोडले होते. यापूर्वी देखील ते अनकेदा मुलीला अशाप्रकारे सासू-सासऱ्याकडे सोडून कामाला जायचे. आजी-आजोबांकडे वेदिका खेळायची. रविवारी देखील तिला सोडल्यावर ती घराच्या आजूबाजूला खेळत असल्याचं काशीनाथ यांच्या सासू-सासऱ्यांना वाटले. मात्र, खेळत असतानाच ती अचानक घराजवळील पाण्याच्या रांजणात पडली. आजूबाजूला कोणीच नसल्याने ही घटना कुणाच्याच लक्षात आली नाही. परंतु, वेदिका बऱ्याच वेळेपासून दिसत नसल्याने नातेवाईकांनी तिचा शोध सुरु केला. तेव्हा घराजवळ असलेल्या रांजणात ती आढळून आली. तर, रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तपासून वेदिकाला मृत घोषित केले.
हरणकाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर...
कन्नड तालुक्यातील शफेपूर येथील काशीनाथ हरणकाळ आणि त्यांची पत्नी मजुरीचे काम करतात. मजुरीचे काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे. वेदिका आई-वडीलांची लाडकी होती. दरम्यान, रविवारी दुर्देवी घटनेत तिचा मृत्यू झाला. त्यामुळे, हरणकाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळले आहे. तर, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
ST Bus Accident : एसटीच्या चाकाखाली आल्याने बालकाचा मृत्यू; शेवगावमधील दुर्देवी घटना