(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Shirsat : त्याच टीका आणि तेच टोमणे; वज्रमूठ सभेवरून संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Sanjay Shirsat : महाविकास आघाडीच्या सभेत झालेल्या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे.
Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha : मुंबईत सोमवारी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा (Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha) पार पडली. या जाहीर सभेतून मविआच्या नेत्यांनी शिंदे-भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आहे. दरम्यान, याच सर्व टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उत्तर दिले आहे. या सभेतून विशेष काही अर्थ काढण्यासारखं काहीच नव्हते. तर त्याच टीका आणि तेच टोमणे पाहायला मिळाल्या असल्याचा टोला शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट?
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले की, या सभेला शेवटची सभा म्हणावी लागेल. कारण आधी छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि आता मुंबईत झाली आहे. या सभेमध्ये जर पाहिले तर ही सभा महानगरपालिकेच्या प्रचारासाठी होती की, महाराष्ट्राच्या हिताची होती याबाबत बोधच झाला नाही. कारण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपले मत मांडत होता. सत्ता गेल्यावर आलेली निराशा त्यांच्यावर चेहऱ्यावर पाहायला मिळत होती. सत्ता गेल्यावर काय हाल होतात हे देखील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. या सभेत महाराष्ट्र हिताचे, शेतकऱ्यांच्या हिताचे किंवा कामगारांसाठी कोणतेही प्रश्न मांडताना मला पाहायला मिळाले नाही. पुन्हा त्याच टीका आणि तेच टोमणे पाहायला मिळाले.
"सभेमध्ये कोणताही बेस मला दिसला नाही"
मी स्वतः उद्धव ठाकरे यांची संपूर्ण सभा लाईव्ह पाहिली. पण त्यांच्या सभेमध्ये कोणताही बेस मला दिसला नाही. कधी बारसू, कधी पालघर, कधी चीन, कधी सत्तार, कधी बाबरी नेमकं कशावर बोलले हेच मला कळाले नाही. त्यामुळे ही सभा माझ्यादृष्टीने फ्लॉप शो होता. तसेच मुंबईत झालेली ही सभा आपली शेवटची सभा असल्याचं यांनी मनोमन तारलं असावे. त्यामुळेच आपली ही शेवटची भेट समजून सभा सुरु असताना अजित पवार आणि अशोक चव्हाण गप्पा मारत होते. त्यामुळे या सभेतून विशेष काही अर्थ काढण्यासारखं काहीच नाही, असे शिरसाट म्हणाले.
"उद्धव ठाकरे बारसूला जाणार"
बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राणे कुटुंब विरुद्ध ठाकरे गट असा सामना पाहायला मिळत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे कोकणात आले तर त्यांना कोकणातून पळवून लावू असा धमकीवजा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला होता. त्यांच्या याच इशाराला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "मी बारसूतल्या लोकांना भेटणार आणि बोलणार आहे. मला अडवणारे तुम्ही कोण? , मी 6 मेला बारसूला जाणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :