Sandipan Bhumare: संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटी रुपयांची जमीन; हैदराबादमधील सालार जंग कुटुंबाकडून हिबानामा म्हणून भेट, संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात
Sandipan Bhumare: हैदराबादमधील सालार जंग कुटुंबीतील वंशजानं 150 कोटींची जमीन शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावानं भेट म्हणून दिली आहे.

Sandipan Bhumare: हैदराबादमधील सालार जंग कुटुंबीतील वंशजानं 150 कोटींची जमीन शिवसेना खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या ड्रायव्हरच्या नावानं भेट म्हणून दिली आहे. तीन एकर जमिनीची किंमत 150 कोटी इतकी आहे. याप्रकरणी खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे आणि त्यांचा चालक जावेद रसूल यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, शहरातील जागा गिफ्ट दीड ज्यांना देण्यात आली आहे. जावेद रसूल माझे ड्रायव्हर आहेत परंतु, त्यांच्या व्यक्तिगत जीवनाशी माझा कुठलाही संबंध नाही, असं आमदार विलास भुमरे म्हणाले.
हैद्राबादमधील सालार जंग कुटुंबातील वंशजांपैकी एकाकडून 'हिबानामा' (भेटवस्तू) मध्ये संभाजीनगरमधील जालना रोडवरील दाऊदपुरा येथे रेडी रेकनर दरानुसार कोट्यवधी किंमतीची तीन एकरची जमीन मिळाल्याबद्दल शिवसेनेचे खासदार आणि माजी राज्यमंत्री संदीपान भुमरे आणि त्यांचे आमदार पुत्र विलास यांच्या चालकावर आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. सदरील चौकशी परभणीतील एका वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीवरन करण्यात येतेय. ड्रायव्हर जावेद रसूल शेख असं ड्रायव्हरचे नाव आहे.. छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या आर्थिक गणेश शाखेनं या ड्रायव्हरला चौकशीसाठी बोलावलं आहे. त्याच्या आयकर रिटर्नच्या प्रती, उत्पन्नाचे स्थापित स्रोत आणि त्याच्या नावावर गिफ्ट डीड कोणत्या आधारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
वकिलाच्या तक्रारीवरून सध्या तपास सुरू-
परभणीतील एका वकिलाने दाखल केलेल्या तक्रारीवरून सध्या तपास सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं ड्रायव्हरला चौकशीसाठी बोलावलं आहे. कोणत्या आधारावर सालार जंग कुटुंबातील वंशजांनी स्वाक्षरी केली याबाबत स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. सालार जंग वंशज मीर मजहर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी स्वाक्षरी केलेल्या हिबानामाची चौकशी सुरू आहे. सालार जंग कुटुंब हे एक प्रमुख कुलीन कुटुंब होते, ज्यांचे सदस्य पूर्वीच्या हैदराबाद इस्टेटमध्ये निजामांचे पंतप्रधान होते.
हिबानामा म्हणजे नेमकं काय?
हिबानामा हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे.. ज्याद्वारे एखादी व्यक्ती आपली मालमत्ता जमीन, घर, दागिने इ. दुसऱ्या व्यक्तीला निःस्वार्थपणे, म्हणजे कोणतीही आर्थिक देवाण-घेवाण न करता, भेट स्वरूपात देतो. हिबा अरबी शब्द आहे, ज्याचा अर्थ "भेट देणे" (Gift) असा होतो. विशेषतः मुस्लीम कायद्यात हिबा ही संकल्पना महत्त्वाची आहे, पण काही वेळा ती सर्वसामान्य कायदेशीर व्यवहारातही वापरली जाते. हिबानामा करण्याचे नियम काय सांगतात.
हिबा वैध ठरण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे-
1. हिबा देणारा- पूर्णपणे सुजाण (major and of sound mind) असावा. स्वतःच्या मालकीचा मालमत्ता देत असावा.
2. हिबा घेणारा-
तो कोणताही असू शकतो — नात्यातील, मित्र, परकी व्यक्ती, संस्था इ.हिबा स्वीकारण्यास सक्षम असावा.
हिबा केलेली मालमत्ता-
ती मालमत्ता अस्तित्वात असावी (future property वर हिबा वैध ठरत नाही). ती हस्तांतरणायोग्य असावी.
हस्तांतर (Delivery of Possession)-
हिबा हा फक्त बोलून केलेला असेल, तर त्याचे प्रत्यक्ष ताबा (possession) देणे अनिवार्य असते. जर दस्तऐवज लिहून आणि नोंदणी करून केला असेल, तर ताबा हस्तांतर काही वेळा आवश्यक नसेल. स्वेच्छेने केलेला असावा: कोणताही दबाव, फसवणूक किंवा जबरदस्ती नसावी.
नोंदणी (Registration)-
100 रुपयांपेक्षा जास्त मूल्य असलेल्या अचल मालमत्तेसाठी हिबानामा नोंदवणे (registered) कायद्यानुसार बंधनकारक असते (Indian Registration Act, 1908 नुसार). हिबानामा स्टॅम्प पेपरवर तयार होतो आणि त्यासाठी योग्य स्टॅम्प ड्युटी लागू होते.
हिबा रद्द करता येतो का?-
सामान्यतः हिबा एकदा पूर्ण झाल्यावर रद्द करता येत नाही. परंतु, काही विशेष परिस्थितींमध्ये, जसे की हिबा फसवणुकीने किंवा चुकीच्या माहितीवर आधारित झाला असेल, तर न्यायालयाच्या परवानगीने रद्द करता येतो.

























