एक्स्प्लोर
Beed Accident : मजुरांना घेऊन जाणारा पिकअप पलटी; 40 मजूर जखमी; सोयाबीन काढण्यासाठी शेतात निघाले होते
Beed : क्षमतेपेक्षा जास्त लोकं पिकअपमध्ये बसल्याने घाटामध्ये हा पिकअप अडकला होता आणि यावेळी घाटातून खाली उतरत असताना चालकाने अचानक ब्रेक दाबला.
बीड : सोयाबीन काढण्यासाठी शेतात जाणाऱ्या मजुरांचा पिकअप पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये 40 मजूर जखमी झाले असल्याची घटना बीडमध्ये झाला आहे. यामध्ये एका लहान मुलीसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. केजवरून पहाडी पारगावकडे जात असताना हा पिकअप पलटी झाला आणि यामध्ये या अपघातात 40 जण हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्षमतेपेक्षा जास्त लोकं पिकअपमध्ये बसल्याने घाटामध्ये हा पिकअप अडकला होता आणि यावेळी घाटातून खाली उतरत असताना चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळहे पिकअप पलटी झाला. जखमी झालेल्या लोकांमध्ये महिला पुरुषांसह लहान मुलांचा देखील समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement