Marathwada Rain Update : मराठवाड्यात मागील 46 दिवसांत फक्त 22.8 टक्के पाऊसच; 20 टक्के पावसाची तूट
Marathwada Rain Update : जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील पावसाळ्यात 679.5 मिमी सरासरी पावसाचे प्रमाण असून, मागील 46 दिवसांमध्ये 155.2 मिमी पाऊस झाला आहे.
![Marathwada Rain Update : मराठवाड्यात मागील 46 दिवसांत फक्त 22.8 टक्के पाऊसच; 20 टक्के पावसाची तूट Marathwada Rain Update Marathwada get only 22 percent rainfall in the last 46 days Marathwada Rain Update : मराठवाड्यात मागील 46 दिवसांत फक्त 22.8 टक्के पाऊसच; 20 टक्के पावसाची तूट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/489378371a2ac712523dcb78040564011689586744703737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Marathwada Rain Update : गेल्यावर्षी जून आणि जुलै महिन्यात मराठवाड्यातील (Marathwada) काही भागात पावसाने (Rain) अक्षरश: थैमान घातले होते. दरम्यान यंदा मात्र उलट परिस्थिती पाहायला मिळत आहे. जून महिना कोरडा गेल्यावर आता जुलै महिन्याचा अर्धा काळ उलटला असताना विभागात अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. तर मराठवाड्यात मागील 46 दिवसांत फक्त 22.8 टक्के पाऊस झाला (Rainfall inMarathwada)आहे. तसेच 20 टक्के पावसाची तूट असून, खरीप हंगामातील पेरण्यांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील पावसाळ्यात 679.5 मिमी सरासरी पावसाचे प्रमाण असून, मागील 46 दिवसांमध्ये 155.2 मिमी पाऊस झाला आहे.
मराठवाड्यात पावसाने दडी मारल्यामुळे याचे परिणाम पेरण्यांवर परिणाम झाला आहे. सोबतच विभागात असलेल्या 11 मोठ्या प्रकल्पांसह मध्यम 107 व लघु 479 प्रकल्पांमध्ये असलेला पाण्याचा साठा चिंता वाढवणारा आहे. सध्या 80 हून अधिक लघु प्रकल्पांत पाणी नाही (Water Crisis), तर 350 प्रकल्प जोत्याच्या खाली आले आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश ग्रामीण भागातील तहान भागविणारे प्रकल्प आहेत. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिल्यास लघु प्रकल्प कोरडे होण्याच्या वाटेवर आहेत. मध्यम प्रकल्पांपैकी 50 टक्के प्रकल्पांमध्ये कमी पाणीसाठा आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या 34 टक्के साठा आहे. त्यातील चार प्रकल्पांत 25 टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. तर 6 प्रकल्प 50 टक्क्यांच्या आसपास आहेत. तर एका प्रकल्पात 50 टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे. येणाऱ्या काळात समाधानकारक पाऊस पडला नाही, तर जायकवाडीसह (Jayakwadi Dam) सर्व मोठ्या प्रकल्पांतील जलसाठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
- उस्मानाबाद शहराला (धाराशिव) पाणीपुरवठा करणाऱ्या तेरणा मध्यम प्रकल्पात सद्यस्थितीत केवळ 27.60 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिल्यास जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
- नांदेड जिल्ह्यात (Nanded Rainfall) आजघडीला 140.70 मिलीमीटर म्हणजेच 56.28 टक्के इतकाच पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात 60.20 टक्के पेरण्या झाल्या असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे अजून मोठया पावसाची प्रतीक्षा आहे.
- जालना जिल्ह्यात (Jalna)एकूण 64 मध्यम, लघु प्रकल्प आहेत. त्यातील तब्बल 41 प्रकल्पांची पाणी पातळी मृतसाठ्यात गेली आहे. 18 प्रकल्पांत 25 टक्क्यांपर्यंतच उपयुक्त पाणीसाठा आहे. तर 5 प्रकल्पांत 26 ते 50 टक्क्यांपर्यंतच उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण 10.96 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Nanded Rains : नांदेड जिल्ह्यात 56 टक्के पाऊस, 60.20 टक्के पेरण्या पूर्ण; मोठ्या पावसाची प्रतीक्षा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)