एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis: अजित पवारांच्या गटाकडून जिल्हाध्यक्षांची जमवाजमव सुरू; संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष 'नॉट रिचेबल'

Maharashtra Political Crisis: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील सध्या 'नॉट रिचेबल' असल्याने ते अजित पवारांच्या गटात जाण्याची शक्यता आहे. 

Maharashtra Political Crisis: अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या बंडानंतर आता राष्ट्रवादी पक्षात देखील दोन गट निर्माण झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवार विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट सध्या पक्षात पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून आमदारांची जमवाजमव सुरु आहे. मात्र असे असतानाच आता अजित पवारांच्या गटाकडून जिल्हाध्यक्षांची सुद्धा जमवाजमव सुरू असल्याचे दिसत आहे. कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील सध्या 'नॉट रिचेबल' असल्याने ते अजित पवारांच्या गटात जाण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडानंतर आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काहींनी सध्या कोणतेही भूमिका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अशातच आता अजित पवारांच्या गटाकडून जिल्हाध्यक्षांची जमवाजमव सुरू झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील कालपासून नॉट रिचेबल आहेत. ते अजित पवारांच्या गटात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता इतर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी काय भूमिका आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

शहराध्यक्ष शरद पवारांसोबत? 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील हे अजित पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा असतानाच, शहराध्यक्ष मात्र शरद पवारांच्या सोबत आहेत.  शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांबरोबरच राहणार असल्याचे सोमवारी शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन यांनी जाहीर केले. तर शरद पवार यांचा त्याग, जनमानसातील त्यांची प्रतिमा लक्षात घ्यायला हवी. या वयात असा त्रास त्यांना व्हायला नको होता. ईडीच्या भीतीने ग्रासलेली व कमर्शियल माइंडची मंडळीच अजित पवार यांच्याबरोबर जातील. मात्र आम्ही शरद पवारांच्याच सोबत असल्याचे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा छाया जंगले पाटील म्हणाल्या आहेत. 

कोण आहेत कैलास पाटील? 

राष्ट्रवादीचे विध्यामान जिल्हाध्यक्ष कैलास पाटील हे यापूर्वी शिवसेनेत होते. मात्र छगन भुजबळ यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यावर कैलास पाटील देखील त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीत दाखल झाले. पुढे त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आली. मात्र छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जातात. तर जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ते आमदार सतीश चव्हाण यांच्या खंदे समर्थक झाले. त्यामुळे भुजबळ व सतीश चव्हाण हे दोघेही अजित पवार यांच्यासमवेत असल्यामुळे कैलास पाटीलही त्यांच्यासमवेतच असणार असल्याची चर्चा आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

'औरंगजेबाला मी आदर्श मानतो'; राष्ट्रवादीतून बीआरएसमध्ये आलेल्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget