गोवंश वाहतुकीची ट्रक अडवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Chhatrapati Sambhaji Nagar : या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक केली जात असल्याच्या संशयावरून आयशर ट्रक अडवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यावर चाकू आणि तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) समोर आली आहे. गुरुवारी (25 मे) रोजी सावंगी बायपासवर सकाळी 7 वाजता ही घटना घडली आहे. तर या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल मराठे (वय 29 वर्षे) कोटला कॉलनी, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर) असे हल्ला करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. तर फैजल खान फिरोज खान, राजा कुरेश, सोहेल कुरेशी यांच्यासह 30 ते 35 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बंदुकीचं धाक दाखवून ट्रक अडवत 15 ते 20 जणांनी दांडे आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याची तक्रार फैजल खान फिरोज खान यांनी दिली असून, यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल मराठे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादिनुसार, त्यांना एक आयशर ट्रक गोवंश घेऊन शहरात येत असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान याबाबत त्यांनी पोलिसांना 112 डायलवरून माहिती दिली. तसेच ते केम्ब्रिजकडून सावंगी बायपासकडे जात असताना गोवंश घेऊन जाणारी आयशर ट्रक त्यांना उभी दिसली. दरम्यान यावेळी त्यांच्याकडून ट्रक चालकाला गाडीत असलेल्या गोवंश विचारणा करण्यात आली. दरम्यान याचवेळी घटनास्थळी 30 ते 35 अनोळखी लोकं आलेत. तसेच हा नेहमी आपली गाडी अडवत असल्याचे म्हणत अनोळखी लोकांनी मराठे यांच्यावर हल्ला केला. ज्यात चाकू, तलवार, बेस बॉल, दांड्याने वं लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यामुळे मराठे यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा केली. ज्यामुळे मारहाण करणारे लोकं पळवून गेले. तर यात गंभीर जखमी झालेल्या मराठे यांना घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले.
परस्परविरोधी गुन्हा दाखल?
गोवंश वाहतुकीची ट्रक अडवल्याने आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा गुन्हा मराठे यांनी फैजल खान फिरोज खान यांच्यावर केला आहे. तर फैजल खान फिरोज खान यांनी देखील जेव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञात 15 ते 20 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्यात, आयशर ट्रकमधून आपण बैल घेऊन जात असताना केम्ब्रिज-सावंगी बायपासवर दोन चारचाकी वाहनधारकांनी मागे-पुढे गाड्या लावून आपली ट्रक अडवली. यातील एकाने पिस्तुल दाखवली. दरम्यान गाडीत जनावरे असल्याने हे लोकं आपल्याला मारून टाकतील या भीतीने फैजल खान ट्रकमधून उतरून पळाले. मात्र ट्रक अडवणाऱ्या अज्ञात लोकांनी फैजल खान यांना पकडून दांडे आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. ज्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान यावेळी आजूबाजूला राहणारे लोकं जमा झाल्याने मारहाण करणारे लोकं पळून गेले असल्याचं फैजल खान यांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे. तर याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: