एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar: नामांतराविरोधात 1 लाख 48 हजार आक्षेप, समर्थनार्थ केवळ 4166 सूचना

Chhatrapati Sambhaji Nagar: नामांतराविरोधात आतापर्यंत 1 लाख 48 हजार 203 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.

Chhatrapati Sambhaji Nagar: औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचे शासन आदेश राज्य आणि केंद्र सरकराने काढला आहे. दरम्यान याच निर्णयाला काही राजकीय पक्ष आणि संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळे नामांतराविरोधात आक्षेप आणि हरकती विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करण्यात येत आहे. सोबतच समर्थनार्थ देखील अर्ज दाखल केले जात आहे. तर औरंगाबादचं जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करू नये म्हणून आतापर्यंत 1 लाख 48 हजार 203 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारी एका दिवसात 32 हजार 582 हरकती विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत. तर समर्थनार्थ केवळ 4  हजार 166 सूचना आणि 774 पोस्ट कार्ड विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवक जावक विभागात दाखल झाले आहेत. 

छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या निर्णयाविरोधात आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठी 27 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील आवक-जावक विभागात नागरिकांना आपल्या हरकती दाखल करता येणार आहे. दरम्यान यासाठी सोमवारचा शेवटचा दिवस शिल्लक राहिला आहे. तर आतापर्यंत आतापर्यंत 1 लाख 48 हजार 203 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. तर समर्थनार्थ केवळ 4  हजार 166 सूचना आणि 774 पोस्ट कार्ड विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवक जावक विभागात दाखल झाले आहेत.  

बैलगाडीतून अर्ज दाखल करणार... 

छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या विरोधात ज्याप्रमाणे आक्षेप आणि हरकती दाखल करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नामांतराच्या समर्थनार्थ देखील सूचना विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होताना पाहायला मिळत आहे. तर हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीने जिल्हाभरात मोहीम राबवून नामांतराच्या समर्थनार्थ सूचना अर्ज भरून घेण्यात येत आहे. तर सोमवारी हिंदू एकत्रीकरण समितीच्या वतीने बैलगाडी भरून समर्थनार्थ भरण्यात आलेले सूचना अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती हिंदू एकत्रीकरण समितीचे राजेंद्र जंजाळ यांनी दिली आहे. 

सोमवारी मोठी गर्दी होण्याची शक्यता...

छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या विरोधात आणि समर्थनार्थ अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवक-जावक विभागात मोठी गर्दी होत आहे. तर शुक्रवारी देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. दरम्यान सोमवारी शेवटचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तर यावेळी दोन्ही बाजूने अधिकाधिक अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chhatrapati Sambhaji Nagar : 'औरंगाबाद'च्या जागी छत्रपती संभाजीनगरचं फलक; महापालिकेचा 'तो' व्हायरल फोटो 'फेक'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget