एक्स्प्लोर

Kirit Somaiya in Aurangabad : पवारांच्या भेटीनंतर राज्यात आणखी एका गुप्त बैठकीची चर्चा; पाहा कोण कुणाला कुठं भेटलं?

Aurangabad : राज्यात पवारांच्या गुप्त भेटीची चर्चा असतानाच आता आणखी एक गुप्त भेट समोर आली असून, यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Kirit Somaiya in Aurangabad : शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पुण्यातील गुप्त भेटीनंतर गेल्या चार दिवसांपासून यावर राजकीय चर्चा होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या गुप्त बैठकीबाबत वेगवेगळ्या पद्धतीने अंदाज लावले जात आहे. पण, राज्यात या गुप्त भेटीची चर्चा असतानाच आता आणखी एक गुप्त भेट समोर आली असून, यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कारण, भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) बुधवारी रात्री अचानक औरंगाबादमध्ये दाखल झाले आणि त्यांनी एक गुप्त बैठक देखील घेतली. विशेष म्हणजे, शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे नामांकित सीए उपेंद्र मुळे यांची सोमय्यांनी भेट घेतली आहे. 

Kirit Somaiya in Aurangabad : पवारांच्या भेटीनंतर राज्यात आणखी एका गुप्त बैठकीची चर्चा; पाहा कोण कुणाला कुठं भेटलं?

काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते बॅकफूटवर गेल्याचे बोलले जात होते. अशातच सोमय्या अचानक बुधवारी रात्री औरंगाबादमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी भावना गवळी यांचे माजी सीए उपेंद्र मुळे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे सोमय्या यांची अचानक झालेल्या या भेटीची कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. तर सोमय्या यांनी ज्यांची भेट घेतली ते सीए उपेंद्र मुळे भावना गवळी यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी प्रकरणावेळी चर्चेत आले होते. भावना गवळी यांनी आपल्याला खोटे आणि चुकीचे कागदपत्रे बनवण्याचं सांगितले होते असा आरोप मुळे यांनी केला होता. तसेच आपल्या जीवाला धोका असून, आपल्याला गवळी यांच्या लोकांकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही मुळे यांनी केला होता. त्यामुळे सोमय्या यांनी मुळे यांची भेट का घेतली असावी?, या भेटी मागचे कारण काय?, तसेच ही गुप्त भेट का ठरली असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. मात्र, अजूनही या भेटीचे तपशील कळू शकले नाही. तर,सोमय्या रात्री शहरातच मुक्कामी  होते.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

किरीट सोमय्या बुधवारी रात्री अचानक औरंगाबाद शहरात दाखल झाले. तसेच त्यांनी सीए उपेंद्र मुळे यांची गुप्त भेट घेतली. दरम्यान, सोमय्या यांच्या या दौऱ्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला. सोमय्या यांना सरकारने विशेष सुरक्षा पुरवलेली आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी 100 पेक्षा अधिक पोलीस तैनात होते. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकसह अनेक पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात असल्याचे दिसून आले. तर अनेक पोलीस कर्मचारी साध्या वेशात या ठिकाणी पाहायला मिळाले. त्यामुळे या भेटीच्या दरम्यान मुळे यांच्या घराला अक्षरशः छावणीचे स्वरुप आले होते. 

Kirit Somaiya in Aurangabad : पवारांच्या भेटीनंतर राज्यात आणखी एका गुप्त बैठकीची चर्चा; पाहा कोण कुणाला कुठं भेटलं?

इतर महत्वाच्या बातम्या: 

Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमय्यांचा 'तो' व्हिडीओ खरा, मुंबई पोलिसांच्या सूत्रांची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Embed widget