एक्स्प्लोर

Maratha Reservation: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर; मनोज जरांगेंची भेट घेणार का?

Maharashtra News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संभाजीनगर दौऱ्यावर जाणार आहेत. अशातच यावेळी ते मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Devendra Fadnavis to Chhatrapati Sambhajinagar Visit : छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे जरांगे यांची फडणवीस आज भेट घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे फडणवीस यांचा आजचा संभाजीनगरचा दौरा महत्वाचा समजला जात आहे.

जरांगे यांचे उपोषण सुरू असताना आंतरवाली सराटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह अनेक मंत्र्यांनी भेट दिली होती. परंतु, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात झालेल्या उपोषणास्थळी फडणवीस एकदाही गेले नाही. याचवेळी जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर थेट टीकाही केली होती. यावरून भाजप नेत्यांनी देखील जरांगे यांना प्रतिउत्तर दिले होते. आता ज्या छत्रपती संभाजीनगर शहरात जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहे, त्याच संभाजीनगरमध्ये आज फडणवीस येणार आहे. त्यामुळे आज तरी जरांगे आणि फडणवीस यांची भेट होईल का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला येणार फडणवीस 

छत्रपती संभाजीनगरच्या आयोध्या नगरी मैदानावर बागेश्वर धाम यांचे तीन दिवसीय कार्यक्रम होत आहे. आज बागेश्वर बाबांच्या दरबाराचा समारोप होणार आहे. त्यामुळे, याच कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस येत आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे. सोबतच यावेळी फडणवीस यांचे भाषण देखील होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे फडणवीस छत्रपती संभाजीनगर शहरात येणार असल्याची भाजपकडून वेगवेगळ्या वृत्तपत्रात मोठी जाहिरात देखील देण्यात आली आहे.

भुजबळांनी जरांगेची भेट टाळली? 

दोन दिवसांपूर्वी मंत्री छगन भुजबळ देखील छत्रपती संभाजीनगर शहरात आले होते. ज्याप्रमाणे मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती, त्याचप्रमाणे त्यांनी भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला होता. त्यामुळे संभाजीनगर शहरात येऊन देखील भुजबळ यांनी जरांगे यांची भेट घेण्यास टाळले होते. तसेच, आपण जरांगे यांची भेट घेणार नाही, पण त्यांना शुभेच्छा असं भुजबळ म्हणाले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Akshay Shinde Encounter: निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Akshay Shinde Encounter: निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Embed widget