एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar: धक्कादायक! नातलग असलेल्या 3 बालकांना अचानक लुळेपणा अन् अशक्तपणा, छत्रपती संभाजीनगरमधील घटना, आरोग्य यंत्रणा हादरली

Chhatrapati Sambhajinagar: गावात पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत हे सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणेचे नळ आहे. ते पाणी तूर्त पिण्यास न वापरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील खंबाटवस्ती पाथ्री येथे 9 वर्षे व 11 वर्षे वयाच्या 3 बालकांना लुळेपणा, अशक्तपणा आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. या तिन्ही मुलांवर छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू असून, तिन्ही मुले नातेसंबंधात आहेत. आरोग्य यंत्रणेने गावात सर्वेक्षणासह विविध खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या घटनेनंतर खडबडून जागी झालेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे खंबाटवस्ती पाथ्री येथे सर्वेक्षण हाती घेण्यात आले. यात या 3 मुलांव्यतिरिक्त इतर रुग्ण आढळून आलेले नाहीत.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम 9 वर्षीय मुलाला 12 जुलैला अचानक लुळेपणा आणि अशक्तपणा आला. आधी गावात उपचार घेण्यात आले. मात्र, तरीदेखील मुलांची प्रकृती खालावत असल्यामुळे मुलाला छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर 16 जुलै रोजी 11 वर्षीय मुलालाही अचानक अशक्तपणा आल्याने त्यालाही उपचारासाठी दाखल केले. तर, 30 महिन्यांच्या बालकाला 17 जुलैला असाच त्रास सुरू झाला, त्यानंतर त्यालाही उपचारासाठी भरती करण्यात आलं. दोन मुलांवर 'पीआयसीयू'त आणि 30 महिन्यांच्या बालकावर जनरल वॉर्डात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे वडोदबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या खंबाटवस्ती, पाथ्री येथे सर्वेक्षण हाती घेण्यात आलं आहे. या त्रास होत असलेल्या मुलांना सारखीच लक्षणे असल्यामुळे तिन्ही मुलांवर छत्रपती संभाजीनगरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, हे सर्वजण एकमेकांच्या नात्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

पाण्याचा वापर थांबविला

गावात पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत हे सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणेचे नळ आहे. ते पाणी तूर्त पिण्यास न वापरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या.

आरोग्य विभागाने केली 'अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस' म्हणून नोंद

या मुलांची आरोग्य विभागाने 'अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस' (एएफपी) संशयित रुग्ण म्हणून नोंद केली आहे. 'अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस'ची स्थिती ही पोलिओ, गुलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजारासह अन्य काही आजारांमध्ये आढळते.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Embed widget