एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar : दिवसा टाक्या कापडाने झाकलेल्या अन् रात्री बायोडिझेलची विक्री; विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई

Chhatrapati Sambhaji Nagar : अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या व्यवसायाची माहिती थेट विशेष पोलिस महानिरीक्षकांना मिळाल्यावर ही कारवाई झाली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) बायोडिझेल विक्रीचे प्रमाण वाढले आहेत. दरम्यान स्थानिक पोलिसांकडून याबाबत कारवाई अपेक्षित असताना, अशा बायोडिझेल विक्रीवर थेट छत्रपती संभाजीनगर विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. शहराच्या बाहेर एका शिवारातील झुडपांमध्ये अवाढव्य टँकर लपवून दोघांकडून ही अवैधरीत्या बायोडिझेल विक्रीचा व्यवसाय सुरू होता. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या व्यवसायाची माहिती थेट विशेष पोलिस महानिरीक्षकांना मिळाल्यावर ही कारवाई झाली आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांना याबाबत कशी माहिती मिळाली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

मागील काही दिवसांत शहरातील अवैध व्यावसायिकांनी शहर व ग्रामीणच्या हद्दीवर त्यांचे गैरधंदे हलवल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गांधेली शिवारात ट्रकचालकांना बायोडिझेल विक्री करण्यात येत असल्याची देखील काही दिवसांपासून चर्चा होती. दरम्यान याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांना मिळाली होती. त्यामुळे स्थानिक पोलिसांना बाजूला ठेवत चव्हाण यांनी विशेष पथकाला आदेश देऊन छापा टाकण्यास सांगितले. ज्यात वैजापूर येथे कार्यरत असलेल्या सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांना छाप्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारी महक स्वामी गांधेली शिवारात आपल्या पथकासह छापा मारला. तर चार तास कारवाई करत पोलिसांनी या ठिकाणाहून 13 हजार 260 लिटर बायोडिझेल जप्त केले. तसेच या प्रकरणी आरिफउद्दिन खान खमरूद्दीन खान (रा. प्रगती कॉलनी, मकाई गेट) आणि फेरोज खान सिकंदर खान (रा. रशीदपुरा) यांना अटक करण्यात आली. 

दिवसा टाक्या कापडाने झाकलेल्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरिफउद्दीनने हा व्यवसाय सुरु केला, तर फेरोज त्यास मदत करत होता. दिवसा टाक्यांवर कापड टाकून झाकून ठेवले जात होते. रात्री सर्रास विक्री सुरू होती. रात्री अकरा वाजता पथक घटनास्थळापासून काही अंतरावर उभे राहिले. वाहन लांब उभे करून आधी कर्मचाऱ्यांनी  पायी जात खात्री केली. तेव्हाच एक ट्रक तेथे आला. त्यात दोघांनी बायोडिझेल भरण्यास सुरू करताच दबा  धरुन बसलेल्या पथकाने छापा टाकला. यावेळी 20 हजार लिटर टँकरमध्ये 13 हजार लिटरचा साठा आढळून आला. ही कारवाई  सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्यासह उपनिरीक्षक श्रीराम काळे,पोलिस नाईक आत्माराम पैठणकर, गोपाल जोनवाल, दिनेश गायकवाड, अमोल मोरे, योगेश कदम, राजाराम जगताप यांच्यासह रात्री अकरा वाजता छापा टाकला. 

स्थानिक पोलिसांना कसे कळले नाही? 

मागील काही दिवसांत शहरातील अवैध व्यावसायिकांनी आपले धंदे शहर व ग्रामीणच्या हद्दीवर हलवले आहेत. दरम्यान चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गांधेली शिवारात बायोडिझेल विक्रीचा व्यवसाय मागील अनेक दिवसांपासून सुरु होता.  मात्र असे असताना स्थानिक चिकलठाणा पोलिसांना याची खबर कशी लागली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या कारवाईत पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी चिकलठाणा पोलिसांना बाजूला ठेवून थेट वैजापूरच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

संभाजीनगरमधील उद्योजकांना अॅट्रॉसिटीच्या धमक्या देऊन खंडणी मागायचा; पोलिसांनी केलं तडीपार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: पक्ष संकटकाळात खंबीरपणे पाठीशी उभा, धनुभाऊंना गलबलून आलं; म्हणाले, माझ्या देहावरील अग्नीच्या धुरानेही उपकारांची परतफेड होणार नाही
पक्ष संकटकाळात खंबीरपणे पाठीशी उभा, धनुभाऊंना गलबलून आलं; म्हणाले, माझ्या देहावरील अग्नीच्या धुरानेही उपकारांची परतफेड होणार नाही
Video : हायस्कूलच्या ऑफिसमध्येच चारी कोपऱ्यात शिक्षक शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Video : मिठ्या, किसिंग अन् बरंच काही! हायस्कूलच्या ऑफिसमध्येच शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Dhananjay Munde : पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले, 'मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र...'
पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले, 'मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie ReportBharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: पक्ष संकटकाळात खंबीरपणे पाठीशी उभा, धनुभाऊंना गलबलून आलं; म्हणाले, माझ्या देहावरील अग्नीच्या धुरानेही उपकारांची परतफेड होणार नाही
पक्ष संकटकाळात खंबीरपणे पाठीशी उभा, धनुभाऊंना गलबलून आलं; म्हणाले, माझ्या देहावरील अग्नीच्या धुरानेही उपकारांची परतफेड होणार नाही
Video : हायस्कूलच्या ऑफिसमध्येच चारी कोपऱ्यात शिक्षक शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Video : मिठ्या, किसिंग अन् बरंच काही! हायस्कूलच्या ऑफिसमध्येच शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Dhananjay Munde : पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले, 'मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र...'
पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले, 'मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र...'
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Embed widget