एक्स्प्लोर

Aurangzeb Tomb Memorial : औरंगजेबच्या कबरीचा संरक्षित स्मारकाचा दर्जा काढण्याची हिंमत दाखवा; अंबादास दानवेंचा भाजपला आव्हान

Aurangzeb Tomb Memorial : हनुमंताची साथ कर्नाटकात मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रात तुमचीच धाव औरंग्याकडे सुरू आहे.

Aurangzeb Tomb Memorial : गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमात औरंगजेबाचे (Aurangzeb) फोटो झळकल्याने वाद झाल्याचे समोर आले आहेत. तर कोल्हापूरमध्ये देखील औरंगजेबाचे फोटो स्टेटस ठेवण्यावरून हिंसाचार झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान यावरूनच आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “औरंगजेबचा भाजपाला एवढाच तिटकारा असेल तर त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबच्या कबरीला असलेला संरक्षित स्मारकाचा दर्जा काढवून दाखवावा,” असे आव्हान दानवे यांनी दिले आहे. 

दरम्यान यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, "मुगल बादशाह औरंगजेब व टिपू सुलतान यांचे फोटो झळकावणे व व्हाट्सअप स्टेटस ठेवण्यावरून राजकारण सुरू असताना औरंगजेबाचे भूत सत्ताधारीच बाहेर काढत आहेत. तर औरंगजेबचा भारतीय जनता पक्षाला एवढाच तिटकारा असेल तर त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेब याच्या कबरीला असलेल्या संरक्षित स्मारकाचा दर्जा काढवून दाखवावा.

'पार्टी विथ डिफरन्स' जाणीवपूर्वक नजरेआड

तसेच आपल्या ट्विटरवरून दानवे यांनी भाजपवर आरोप करताना म्हटले आहे की, "बाटलीतून भूत' बाहेर काढावे तसा हा औरंग्या सत्ताधारीच आज शिवरायांच्या महाराष्ट्रात उभा करत आहेत. शत्रूची भीती दाखवून मत मागण्याची तुमची जुनी सवय जनता ओळखते. मग तो औरंगजेब असो की, पाकिस्तान. कारवाईची भाषा करणाऱ्यांनी संभाजीनगरात हे पोस्टर नामांतर आंदोलनात पहिल्यांदा दिसले तेव्हा त्यावर काय कारवाई केली, की विसर पडला तुम्हाला याचा? … अल्पवयीन मुले यात सापडत आहेत. ते स्वतःचा मेंदू वापरून हे कृत्य करणे शक्य वाटत नाही. त्यांचा ब्रेनवॉश करणारी यंत्रणा कोण आहे. याकडे 'पार्टी विथ डिफरन्स' जाणीवपूर्वक नजरेआड करत आहे. 

मांजर डोळे मिटून दुध पिते पण तिला जग पाहत असते, हे विसरू नका. हनुमंताची साथ कर्नाटकात मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रात तुमचीच धाव औरंग्याकडे सुरू आहे. स्वतःला सज्जन भासवून दुसऱ्याला दुर्जन म्हणणं फार दिवस चालत नसतं. आम्हाला तर आहेच, तुम्हाला तिटकारा असेल या पापी राजाचा, तर त्याच्या कबरीला असलेला संरक्षित स्मारकाचा दर्जा काढण्याची शिफारस करणारे एक साधे पत्र तुमच्या दिल्लीश्वर दैवताला लिहिण्याची हिम्मत तर दाखवा, असेही दानवे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Beed: आष्टीत औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने तणाव, हिंदू संघटनांकडून बंदचा निर्णय; शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ambadas Danve: मोठी बातमी : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज निरोप समारंभ, पुन्हा विधानपरिषदेत परतणं कठीण?
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज निरोप समारंभ, पुन्हा विधानपरिषदेत परतणं कठीण?
Raj Thackeray-Uddhav Thackeray: युतीच्या चर्चा आता तुमच्याशी करायच्या का?; राज ठाकरेंची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
युतीच्या चर्चा आता तुमच्याशी करायच्या का?; राज ठाकरेंची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
Donald Trump :  फार्मा कंपन्यांवर 200 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावणार,डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा,कंपन्यांना एका वर्षाची मुदत
डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक टॅरिफ बॉम्ब, फार्मा कंपन्यांना 200 टक्के टॅरिफचा इशारा, एक वर्षाची मुदत...
आधी पोलीस अधीक्षकांची भेट, बाहेर येताच विषप्राशन; बीडध्ये ज्ञानेश्वरी मुंडेंचा दुसऱ्यांदा आत्मदहनाचा प्रयत्न
आधी पोलीस अधीक्षकांची भेट, बाहेर येताच विषप्राशन; बीडध्ये ज्ञानेश्वरी मुंडेंचा दुसऱ्यांदा आत्मदहनाचा प्रयत्न
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full Episode : हनी ट्रॅप, नैतिकतेची गॅप, राजकारणी, अधिकारी घसरतात कसे?
Mumbai Court Infrastructure | खासदार Ravindra Waikar यांनी Andheri Court मधील वकील समस्यांवर दिले आश्वासन.
Ganeshotsav ST Buses | कोकणात जाण्यासाठी 5००० जादा गाड्या, 22 जुलैपासून बुकिंग सुरू
Electric Water Taxi | मुंबईत 'ई-वॉटर टॅक्सी' १ ऑगस्टपासून, पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय
Mumbai Hawkers | मुंबईत फेरीवाल्यांचे आंदोलन, Industry Minister Uday Samant यांचे २४ तासांत तोडग्याचे आश्वासन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve: मोठी बातमी : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज निरोप समारंभ, पुन्हा विधानपरिषदेत परतणं कठीण?
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज निरोप समारंभ, पुन्हा विधानपरिषदेत परतणं कठीण?
Raj Thackeray-Uddhav Thackeray: युतीच्या चर्चा आता तुमच्याशी करायच्या का?; राज ठाकरेंची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
युतीच्या चर्चा आता तुमच्याशी करायच्या का?; राज ठाकरेंची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
Donald Trump :  फार्मा कंपन्यांवर 200 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावणार,डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा,कंपन्यांना एका वर्षाची मुदत
डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक टॅरिफ बॉम्ब, फार्मा कंपन्यांना 200 टक्के टॅरिफचा इशारा, एक वर्षाची मुदत...
आधी पोलीस अधीक्षकांची भेट, बाहेर येताच विषप्राशन; बीडध्ये ज्ञानेश्वरी मुंडेंचा दुसऱ्यांदा आत्मदहनाचा प्रयत्न
आधी पोलीस अधीक्षकांची भेट, बाहेर येताच विषप्राशन; बीडध्ये ज्ञानेश्वरी मुंडेंचा दुसऱ्यांदा आत्मदहनाचा प्रयत्न
Home Loan : गृह कर्ज स्वस्त होण्याची शक्यता, आरबीआय पुन्हा रेपो रेटमध्ये कपात करणार, रिपोर्टमध्ये मोठा दावा
गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज, व्याज दर आणखी घटणार, आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता
चड्डी बनियन गँग हाय हाय, गुंडाराजचं करायचं काय, खाली डोकं वर पाय; जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, दानवे थेट टॉवेल बनियनवर विधानभवनात!
चड्डी बनियन गँग हाय हाय, गुंडाराजचं करायचं काय, खाली डोकं वर पाय; जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, दानवे थेट टॉवेल बनियनवर विधानभवनात!
Nagpur News : यूनियन बँकेतील मराठी भाषेच्या आडमुठे धोरणाविरोधात मनसेची उडी; बँकेपुढे कार्यकर्त्यांचा जमाव, पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात
यूनियन बँकेतील मराठी भाषेच्या आडमुठे धोरणाविरोधात मनसेची उडी; बँकेपुढे कार्यकर्त्यांचा जमाव, पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात
उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्याच्या हालचाली गतिमान; तब्बल 40 वर्षांच्या लढ्यानंतर स्वप्न सत्यात उतरणार
उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्याच्या हालचाली गतिमान; तब्बल 40 वर्षांच्या लढ्यानंतर स्वप्न सत्यात उतरणार
Embed widget