एक्स्प्लोर

Aurangabad ACB Trap : लाखोंची लाच मागण्याची हिंमत येतेच कुठून! आता पुन्हा एक लाचखोर 'बाबू' एसीबीच्या जाळ्यात

Aurangabad  ACB Trap : औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक नगर रचनाकार पदावर कार्यरत असलेल्या पवन परिहारवर एसबीची कारवाई.

Aurangabad ACB Trap : नाशिकमधील (Nashik) तहसीलदाराला 15 लाख रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना रंगेहाथ पडकडण्यात आल्याची घटना ताजी असतानाच, आता औरंगाबादच्या (Aurangabad) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देखील अशीच मोठी कारवाई केली. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक नगर रचनाकार पदावर कार्यरत असलेल्या पवन परिहार याने दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्यावर एसीबीच्या पथकाने कारवाई केली आहे. तर त्याच्यावर सिडको पोलिसांत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण? 

पवन परिहार हा औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक नगर रचनाकार पदावर कार्यरत आहे. दरम्यान, तक्रारदार समर्थ इन्फ्रा फर्म कन्स्ट्रक्शनचे काम पाहतात. या कंपनीच्या संचालकांनी चिकलठाणा परिसरातील गट क्र. 377 मधील 17 हजार 100 स्क्वेअर मीटर जागेचे विकास करारनाम्याचे शासकीय मूल्यांकन निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. विशेष म्हणजे हा अर्ज परिहारकडे आला. कारण, रचनाकार परिहारकडे याची मुख्यत्वे जबाबदारी होती. मात्र, पवन परिहार हा तक्रारदारांना कार्यालयात चकरा मारायला लावून दालनाच्या बाहेर उभे करत होता. त्यानंतर त्याने तीन लाख रुपये लागतील, असे सांगितले. तसेच तक्रारदाराला रोज चकरा मारायला लावल्या. तक्रारदारासोबत कंपनीचे बडे संचालक, भागीदार देखील गेले. मात्र, पैशांसाठी त्याने त्यांनाही तासनतास दालनाबाहेर उभे केले. शेवटी तडजोडीअंती त्याने दीड लाख रुपये मागितले. तक्रारदाराने याची एसीबी अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. पथकाने याची खात्री केली असता त्याने तीन वेळा पैसे मागितल्याचे स्पष्ट झाले. 

कारवाईची कुणकुण लागताच मेडिकल रजा टाकून पसार

तक्रारदार यांचा अर्ज मार्गी लावण्यासाठी परिहार याने तीन लाख रुपयांची मागणी केली. शेवटी तडजोडीअंती दीड लाखाचा सौदा ठरला. मात्र, कंपनीला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबी कार्यालयात धाव घेत तक्रार दिली. एसीबीच्या पथकाने लाचेची खात्री केली असता परिहार याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पथकाने सापळा रचला. मात्र, तक्रारदारावर संशय आल्याने परिहारने ऐनवेळी पैसे स्वीकारणे टाळले. तसेच आठ दिवसांपूर्वी त्याला कारवाईची शक्यता जाणवताच मेडिकल रजा टाकून पसार झाला. त्यामुळे लाच मागिल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एसीबीच्या पथकाकडून त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

15 लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदाराला रंगेहात पकडले, नाशिकमध्ये ACB मोठी कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शिखर धवनची एन्ट्री! ICC ची मोठी घोषणा, सोपवली महत्त्वाची जबाबदारी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शिखर धवनची एन्ट्री! ICC ची मोठी घोषणा, सोपवली महत्त्वाची जबाबदारी
Mahesh Nagulwar : पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
Mutual Fund : शेअर बाजारातील घसरणीचा फटका, जानेवारीत म्यूच्युअल फंड्सची AUM 1.1 लाख कोटींनी घटली, SIP च्या रकमेतही घट
शेअर बाजारातील घसरणीचा म्यूच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर परिणाम, SIP च्या रकमेत घट,पाहा काय घडलं?
Thackeray Camp & Shinde Camp: मीरा भाईंदरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; तीन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, नाशिकमध्येही पक्षाला लागली गळती
ठाकरे गटाला लागली गळती, धडाधड राजीनामे पडले; राजन साळवी शिंदेंचा भगवा खांद्यावर घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 13 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सEknath Shinde Sharad pawar Spl Report : पवार-शिंदेच्या भेटीने ठाकरे का अस्वस्थ झले? फडणवीसांना इशारा काय?Rashmika Mandana Speaks Marathi : जेव्हा विकी कौशल रश्मिकाला मराठी बोलायला शिकवतो..FULL VIDEOABP Majha Headlines : 11 PM : 12 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शिखर धवनची एन्ट्री! ICC ची मोठी घोषणा, सोपवली महत्त्वाची जबाबदारी
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये शिखर धवनची एन्ट्री! ICC ची मोठी घोषणा, सोपवली महत्त्वाची जबाबदारी
Mahesh Nagulwar : पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद जवान महेश नागुलवार यांना मानवंदना, नक्षल्यांसोबतच्या चकमकीत आले वीरमरण
Mutual Fund : शेअर बाजारातील घसरणीचा फटका, जानेवारीत म्यूच्युअल फंड्सची AUM 1.1 लाख कोटींनी घटली, SIP च्या रकमेतही घट
शेअर बाजारातील घसरणीचा म्यूच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर परिणाम, SIP च्या रकमेत घट,पाहा काय घडलं?
Thackeray Camp & Shinde Camp: मीरा भाईंदरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; तीन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, नाशिकमध्येही पक्षाला लागली गळती
ठाकरे गटाला लागली गळती, धडाधड राजीनामे पडले; राजन साळवी शिंदेंचा भगवा खांद्यावर घेणार
Sharad Pawar: संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
संजय राऊतांकडून टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; एकनाथ शिंदेंच्या सत्कारवरुन वार-प'वार'
New Income Tax Bill : नवं प्राप्तिकर विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता, कर किती द्यावा लागणार? नेमकं काय बदलणार?
नवं प्राप्तिकर विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता, विधेयकात किती विभाग? नेमकं काय बदलणार?
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सराव सामने!
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सराव सामने!
Ind vs Eng 3rd ODI : फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
Embed widget