एक्स्प्लोर

काय सांगता! चक्क पीएचडी चोरीला, थेट राज्यपालांकडून दखल; संशोधन रद्द करण्याचा निर्णय

Chhatrapati Sambhaji Nagar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पीएचडी 'कॉपी पेस्ट'मुळे रद्द झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : आतापर्यंत आपण अनेक चोरीच्या घटना पहिल्या असतील, पण छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) चक्क पीएचडी (PHD) चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन थेट राज्यपाल कुलपती रमेश बैस (Ramesh Bai) यांनी या पीएचडीचे संशोधनच रद्द केल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पीएचडी 'कॉपी पेस्ट'मुळे रद्द झाली आहे. किशोर निवृत्ती धावे असे 'कॉपी-पेस्ट' करणाऱ्याचे नाव असून, धावे यांनी राज्यशास्त्र विषयाच्या प्रबंधात 51 ते 65 टक्के चोरी केल्याचे समोर आले आहे. 

अधिक माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत राज्यशास्त्र विषयात किशोर निवृत्ती धाबे यांनी दहा वर्षांपूर्वी पीएच.डी पदवी प्राप्त केलेली होती. 'किनवट तालुक्यातील आदिवासी नेतृत्त्व आणि आदिवासीसाठींच्या कल्याणकारी ध्येय धोरणांची 'अंमलबजावणी' या विषयांतर्गत त्यांनी 2013 मध्ये पीएच.डी. प्राप्त झाली. सदरील शोध प्रबंधात वाङ्मय चोरी करण्यात आली असल्याची तक्रार कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे पुरुषोत्तम रामटेके यांनी पुराव्यासह दाखल केली होती. डॉ. मारोती तेगमपुरे व देशमुख यांच्या शोधप्रबंधातील मजकूर चोरण्यात आल्याची तक्रार होती. या तक्रारीनुसार डॉ. धर्मराज वीर, डॉ. शूजा शाकेर व डॉ. मृदुल निळे या तीन सदस्यांची विभागांतर्गत चौकशी समिती (इन्स्टिटयूशनल अॅकेडमिक इंटिग्रेटेड पॅनेल) नेमण्यात आली. 

सुनावणीनंतर विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय मान्य 

समितीने शोधप्रबंधात 51 टक्के वाड्ःमय चौर्य झाल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय विद्यापीठस्तरीय सत्यशोधन समितीनेही चौकशी केली. चा चौकशीत 65 टक्के वाड्:मयचौर्य केल्याचा अहवाल देण्यात आला. यानंतर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व विद्या परिषद बैठकीतही सवार्नुमते हा अहवाल स्विकारुन पीएच.डी. रद्द करण्यास संमती देण्यात आली. या नंतर गेल्या महिन्यात कुलपती रमेश बैस यांच्याकडे या प्रकरणाची सुनावणी झाली. विद्यापीठाच्यावतीने प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा व विधि अधिकारी किशोर नाडे यावेळी उपस्थित होते. या सुनावणीनंतर विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय मान्य करुन पीएच.डी. रद्द करण्याचा निर्णय कुलपती यांनी मंजूर केला आहे. 

विद्यापीठाच्या 65 वर्षांच्या इतिहासातील पहिलीच घटना...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत आतापर्यंत वेगवेगळ्या विषयात अनेकांनी पीएचडी मिळवली आहे. यासाठी संशोधन करून पीएचडीधारक पदवी मिळवत असतात. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पीएचडी 'कॉपी पेस्ट'मुळे रद्द करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Chhatrapati Sambhajinaga : आधी शहराचे अन् आता विद्यापीठाचेही नाव बदलणार; मराठवाडा विद्यापीठापुढे यापुढे छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?

व्हिडीओ

BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर
BMC Election Result Shivsena vs UBT Shivsna : फोडाफोडीचे डाव की सत्तास्थापनेचा पेच?
PM Narendra Modi On BJP Mumbai Win : मुंबईत भाजपला रेकॉर्डब्रेक जनमत, नरेंद्र मोदींकडून कौतुक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
Embed widget