एक्स्प्लोर

Marathwada Cabinet Meeting : औरंगाबादकरांनो आज घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीतील बदल पाहा; अन्यथा वाहतूक कोंडीत अडकाल

Marathwada Cabinet Meeting : मंत्री मंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध आंदोलन आणि मोर्चे येण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद :  आज म्हणजेच 16 सप्टेंबरला औरंगाबाद शहरात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. सोबतच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या दौऱ्यासह मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्त शहरातील प्रमुख रस्ते आज बंद राहणार आहेत. मंत्री मंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध आंदोलन आणि मोर्चे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक सुरळीत पार पडावी यासाठी औरंगाबाद शहर पोलिसांनी शहरातील वाहतुकीत काही बदल केला आहे. त्यामुळे आज घराबाहेर पडताना औरंगाबादकरांनी काळजी घेण्याची गरज आहे, अन्यथा त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो..

हे रस्ते राहतील बंद :

  • सकाळी 7 ते 10 पर्यंत शहानूरमियाँ दर्गा चौक ते सूतगिरणी चौक रस्ता बंद
  • सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यत भडकल गेट ते अण्णा भाऊ साठे चौक रस्ता पूर्णपणे बंद राहील.
  • सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत गोपाळ टी ते सिल्लेखाना व क्रांती चौक रस्ता बंद रहाणारक्रांती चौक उड्डाणपुलाच्या पूर्व, पश्चिम बाजूचा सर्व्हिस रस्ता पूर्णपणे बंद.
  • सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत क्रांती चौक, अजबनगर, बंडू वैद्य चौक, सावरकर चौक, निराला
  • बाजार, नागेश्वरवाडी, खडकेश्वर टी, सांस्कृतिक मंडळ, ज्युबिली पार्क, भडकल गेट रस्ता बंद.

असा असणार वाहनांसाठी पर्यायी मार्ग: 

  • संग्रामनगर उड्डाणपुलाजवळून शंभूनगर, गादिया विहार ते शिवाजीनगरमार्गे वाहने जातील, येतील.
  • शिवाजीनगर, बारावी योजना मार्ग, गोकूळ स्वीट, जयभवानी चौकमार्गे पुढे जातील व येतील.
  • अण्णा भाऊ साठे चौक, टीव्ही सेंटर चौक, सेंट्रल नाका, सेव्हन हिल्स, क्रांती चौक उड्डाणपुलावरून महावीर चौक, मिल कॉर्नरमार्गे पुढे जातील व येतील.
  • राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मिल कॉर्नरहून यूटर्न घेऊन कार्तिकी चौक, महावीर चौक, क्रांती चौक उड्डाणपुलावरून जळगाव टीमार्गे पुढे जातील व येतील.
  • गोपाळ टी, उत्सव मंगल कार्यालय, काल्डा कॉर्नरमार्गे पुढे जातील व येतील.
  • गोपाळ टी, कोकणवाडी, क्रांतीनगरमार्गे पुढे जातील व येतील.
  • प्रोझोन मॉल, एन-१ चौक, वोक्हार्टमार्गे येतील व जातील.

शहरासाठी कोणत्या घोषणा होणार? 

मंत्रिमंडळाची आज औरंगाबाद शहरात बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत औरंगाबाद शहराला काय मिळणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनला असून, नवीन पाणीपुरवठा योजनेबाबत काही घोषणा होणार का? याकडे देखील लक्ष लागले आहेत. सोबतच स्थानिक विकासकामांसाठी देखील कोणत्या घोषणा होणार का? हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातमी :

Marathwada Cabinet Meeting : दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्याला मिळणार 40 हजार कोटींचे पॅकेज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
Mirzapur Season 3 Review :   गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Full PC : 1500 रुपयात काय येणार? लाडकी बहीण योजनेवरुन सरकरला सुनावलं!Vijay Wadettiwar Full PC : सरकारकडून शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी,  विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीकाSanjay Raut on Victory Parade Bus:गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे का? :संजय राऊतRohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
विधान परिषद निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात; कोण लढणार अन् कोण माघार घेणार?
Mirzapur Season 3 Review :   गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू
Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Mirzapur 3  Online Leaked :   'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक
Pune Crime : पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Embed widget