एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमधील तोतया IAS महिलेचा अफगाणिस्तानी बॉयफ्रेंड सात वर्षांपासून भारतातच; बँक खात्यांमधून 32 लाखांच्या व्यवहाराची माहिती, चौकशी सुरू

Chhatrapati Sambhajinagar: सात वर्षापासून सुकामेवा व्यवसायाचे कारण पुढे करून भारतात राहणाऱ्या तिच्या प्रियकराशी तिची एसएफएस शाळेच्या मैदानावर ओळख झाली होती.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरातील (Chhatrapati Sambhajinagar) जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शहरातील एका महिलेने तब्बल सहा महिने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुक्काम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सिडको पोलिसांनी संशयाच्या आधारे कारवाई करत हॉटेलमधील त्या महिलेच्या रूमची झडती घेतली असता महिलेच्या बॅगेत २०१७ च्या यूपीएससी निवड यादीची प्रत आढळली, ज्यात तिचे नाव ३३३ व्या क्रमांकावर होते. आधार कार्डवरही खाडाखोड केल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत तिच्या खात्यात अफगाणिस्तानातील बॉयफ्रेंड अशरफ खलील व पाकिस्तानातील त्याचा भाऊ आवेद यांच्या खात्यांतून मोठ्या रकमा आल्याचे समोर आले. दोघांचे पासपोर्ट, व्हिसा आणि भारतात येण्याच्या अर्जाचे फोटोही तिच्या मोबाइलमध्ये आढळून आले आहेत. संपूर्ण प्रकरण अत्यंत संशयास्पद ठरल्याने एटीएस व आयबीकडून महिलेची कसून चौकशी सुरू आहे. या महिलेचे नाव कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय 45) ही महिला तब्बल सहा महिन्यांपासून जालना रोडवरील अॅम्बेसेडर या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहात असल्याचं उघड झालं आहे. (Chhatrapati Sambhajinagar) 

Chhatrapati Sambhajinagar: सात वर्षापासून सुकामेवा व्यवसायाचे कारण पुढे करून भारतात 

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बनावट कागदपत्रांसह सहा महिन्यांपासून मुक्काम ठोकणाऱ्या या ४५ वर्षीय कल्पना भागवत (रा. चिनार गार्डन, पडेगाव) या महिलेची केंद्रीय गुप्तचर यंत्रणांसह राज्य गुप्तचर विभागाकडून सध्या कसून चौकशी सुरू आहे. सात वर्षापासून सुकामेवा व्यवसायाचे कारण पुढे करून भारतात राहणाऱ्या तिच्या प्रियकराशी तिची एसएफएस शाळेच्या मैदानावर ओळख झाली होती. तेव्हा कल्पनाने लॉबिस्ट, लायजनिंगचे काम करत असल्याचे सांगून संवाद वाढवला होता.

एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सहा महिन्यांपासून संशयास्पद वास्तव्य करणाऱ्या या कल्पना भागवतला पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी केंद्रीय गुप्तचर यंत्रणांसोबत राज्य गुप्त वार्ता विभागाने काल (मंगळवारी) तिची ३ तास चौकशी केली. त्यातही तिने लायजनिंगचे काम करत असल्याची माहिती दिली आहे. त्यासाठी तिने बनावट कागदपत्रे तयार केल्याचे सांगितले आहे. आज (बुधवारी) तिची पोलिस कोठडी संपत आहे. बुधवारी दुपारी तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली जाईल.

Chhatrapati Sambhajinagar: ते बँक खाते का केले बंद?

कल्पनाने केलेल्या प्रत्येक आर्थिक व्यवहाराच्या माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी बँकेला पत्र पाठवले होते. यात ३२ लाखांच्या व्यवहाराची माहिती समोर आली आहे. मात्र, यातील एक खाते बंद झाल्याचे दिसून आले. हे कधी व का बंद झाले, याचा पोलिस तपास करत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar: प्रियकर निघाला ड्राय फ्रूटचा व्यवसायिक

मूळ अफगाणिस्तानचा असलेला कल्पनाचा प्रियकर सात वर्षांपासून देशात वास्तव्यास आहे. ड्राय फ्रूटचा व्यवसाय करत असून तो सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. त्याला भेटण्यासाठी ती कायम विमानाने दिल्लीला जात होती. दिल्लीशिवाय ती उदयपूर, जयपूरलाही सातत्याने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar: कल्पना भागवत तिचे पोलिसा तपासादरम्यान समोर आलेले कारणामे

- सदरील महिला ही जयपूर दिल्लीला सातत्याने गेल्याचे समोर आलं आहे.
- ती दिल्लीच्या पावर मिनिस्ट्रीमध्येही अनेकांना भेटली. गृह विभागातही अनेकांना भेटल्याचा तिचा दावा आहे.
- ज्यांना व्हिजा मिळत नाही त्यांना व्हीजा मिळून देण्याचं ती आश्वासन देते.
- मोठ्या बदल्याचं काम करण्याचं आश्वासन देखील ती देते.
- पुण्यातील एका माजी कुलगुरूचं ही बेस्ट आयएस अधिकारी, सामाजिक काम असल्याचे सर्टिफिकेट तिच्याकडे आहे. तिने ते बनवलं का खरोखर दिल याचा पोलीस तपास करत आहेत.
- लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये ती राहत होती. तिचा मित्र अफगाणचा आहे, तो तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे.
- सदरील मित्राची आई आणि भाऊ पाकिस्तानमध्ये राहतो या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
- महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना भेटल्याचा तिचा दावा आहे.
- प्रति दिवस सात हजार रुपये भाडं असलेल्या शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सहा महिन्यांपासून आईसोबत वास्तव्यास होती.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget