एक्स्प्लोर
Advertisement
PMC Bank Scam | पीएमसी बँक घोटाळ्यात चार्जशीट दाखल, लवकरच लिलावाद्वारे जप्त संपत्ती विकून ग्राहकांना पैसे देण्याचा प्रयत्न
पीएमसी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी वाधवान पितापुत्र तपासयंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहेत. बँकेचे बुडालेले पैसे मिळवून देण्यासाठी एचडीआयएलची मालमत्ता लिलावाद्वारे विक्री करण्यासही त्यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे त्यांचा जामीन मंजूर करावा अशी वाधवान यांच्या वकिलांनी केलेली ही मागणी हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.
मुंबई : पीएसी बँक घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आरोपपत्र दाखल केलं आहे. किला कोर्टात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. दुसरीकडे खातेदारांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पीएमसी बँकेने एक पाऊल उचललं आहे. जप्त केलेल्या संपत्तीचा बँकेकडून लिलाव करण्यात येणार आहे. लिलावाद्वारे जप्त संपत्ती विकून ग्राहकांना पैसे देण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे. या लिलावामधून मिळणाऱ्या पैशांमधून 16 लाख ग्राहकांना त्यांचे हक्काचे पैसे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंजाब अँड महाराष्ट्र बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या पीएमएलए कोर्टात ईडीनं सात हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि एचडीआयएल समुहाचे सर्वेसर्वा राकेश आणि सारंग वाधवान पितापुत्रांविरोधात प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट अंतर्गत विविध कमलांखाली आरोप लावण्यात आले आहेत.
हेही वाचा- पीएमसी बँक घोटाळ्यात ईडीकडून पहिलं आरोपपत्र दाखल
या घोटाळ्याची कुणकूण लागताच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या दोघांसह बँकेच्या काही कर्मचाऱ्यांना अटक केली होती. मात्र जसजसा तपास पुढे गेला तशी या आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती समोर आली. त्यानंतर मग ईडीनं आरोपींचा ताबा घेत पुढील तपास सुरू केला. सुमारे 6700 कोटींच्या या घोटाळ्यात पीएमसी बँकेतील सर्वसामान्य खातेदारांची जवळपास 73 टक्के रक्कम बुडाल्याचं समोर येताच आरबीआयनं बँकेवर आर्थिक निर्बंध लावत बँकेवर प्रशासकाची नेमणूक केली आहे.
हेही वाचा - पीएमसी बँक खातेधारकांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
दरम्यान, पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या कर्जाची वसुली करण्यासाठी कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करण्यास आमची हरकत नाही, असं एचडीआयएलच्यावतीने व्यवस्थापकीय संचालक आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी सारंग वाधवान यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाला कळवलं होतं. त्यामुळे पीएमसी खातेदारांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती.
सारंग वाधवान आणि कंपनीचे विकासक राकेश वाधवान दोघा पिता-पुत्रांना या प्रकरणात अटक झाली असून हे दोघेही सध्या न्यायलयीन कोठडीत आहेत. वाधवान यांच्यावतीने हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये या लिलावाबाबत संमती देण्यात आलेली आहे.
हे पाहा- PMC Bank | बँकेचे संचालक वरियम सिंग यांच्या घरावर खातेदारांचा मोर्चा | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement