मिलिंद गवळी यांची पोस्ट
मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'मी स्मिता जयकर' पुस्तक पुण्यात प्रकाशित झालं. नियती कसा खेळ खेळत असते बघा,एखाद्या व्यक्तीची आपल्याला नियतीला जर भेट घालून द्यायची असेल तर कशीही काहीही करून ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येतेच येते,पंचवीस तीस वर्षांपूर्वी रमेश साळगावकर नावाचे दिग्दर्शक माझ्याकडे “सत्वपरीक्षा” नावाचा सिनेमा घेऊन आले होते, या चित्रपटांमध्ये मला त्यांनी एक भूमिका याचा आग्रह केला होता,लक्ष्मीकांत बेर्डे हिरो, रेशम टिपणीस हीरोइन आणि मला व्हिलनचा रोल त्यांनी ऑफर केला होता, मी व्हिलन आहे म्हणून मी तो रोल स्वीकारला नाही आणि तो चित्रपट केला नाही, या चित्रपटामध्ये स्मिता जयकर त्या विलनच्या आई ची भूमिका करत होत्या, त्यांना भेटायची त्यांच्याबरोबर काम करायची संधी माझी गेली. त्यांची आणि माझी भेट व्हायचीच होती म्हणून सात आठ वर्षानंतर देवकी चित्रपटांमध्ये त्यांनी पाहुणी कलाकार म्हणून एक दिवसाचं काम केलं. ईतक्या वर्षांने नियतीने आमची गाठ घालून दिली,पण फक्त काही तासांसाठी, फार ओळख ही झाली नाही आमची, मग दहा एक वर्षानंतर अर्चना नेवरेकर फाउंडेशनच्या सांस्कृतिक कला दर्पण कार्यक्रमांमध्ये आम्ही नाटक आणि सिनेमा याचे परीक्षक म्हणून एकत्र आलो . “देव बाभळी” “अनन्या” अशी सुंदर सुंदर नाटक एकत्र बसून बघितली , त्या नाटकांवर चर्चा केली योग्य त्या लोकांना बक्षीस दिली, या सगळ्या प्रवासामध्ये आमची एक छान निखळ मैत्री ही झाली, नियती कसा खेळ खेळते बघा , “सत्व परीक्षा” मध्ये मला व्हिलनचा रोल दिला होता म्हणून मी तो स्वीकारला नव्हता पण आजच्या तारखेला अनिरुद्ध देशमुख सारखा विलन मी सलग तीन वर्ष करतो आहे आणि आणि डोक्याचा भुगा झाला असल्याने ते डोकं ठिकाणावर ठेवण्यासाठी स्मिताजीच मला सातत्याने मदत करतात. या वाल्याचा वाल्मिकी होण्याचा मार्ग स्मिताजींच्या Through जातो आहे का? कदाचित नियतीलाच माहीत असेल.'
मिलिंद गवळी यांनी पालखी, आधार आणि वैभव लक्ष्मी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत असतात. आई कुठे काय करते मालिकेमधील त्यांच्या अनिरुद्ध या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: