मुंबई: कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात मनी लॉंड्रिंगचा तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासात काही नवीन बाबी समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात एक मनी ट्रायल झाल्याचं ईडीच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे महामारीच्या काळात दहिसर येथील कोविड-19 फील्ड हॉस्पिटलचे व्यवस्थापन करण्यासाठी बीएमसीने संजय राऊत यांचे निकटवर्ती असलेले सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विस लिमिटेड फर्मला 30 कोटी रुपये दिले होते. त्यात व्यवस्थापनच्या कामासाठी फक्त 8 कोटी रुपये वापरल्याचे ईडीला आढळून आले. उरलेले 22 कोटी रुपये कुठे गेले हा प्रश्न उपस्थित होत आहे.


या प्रकरणातले 22 कोटी रुपये कुठे हस्तांतरित झाले याचा तपास ईडीचे अधिकारी करत आहेत. तपासात ईडीला आढळले की बीएमसीने जे एलएचएमएसला 30 कोटी रुपये कामासाठी दिले होते, त्यापैकी 22 कोटी रुपये अनेक संशयास्पद संस्थांकडे वळवण्यात आले आहेत. त्याचबरोबर वळवलेल्या निधीपैकी काही कोटी रुपये रोख स्वरूपात काढण्यात आले आहेत तर बाकीचे इतर संस्थांच्या बँक खात्यात पाठवण्यात आलेले आहेत. 


मात्र मनी लाँड्रिंगचा तपास करत असलेले ईडी अधिकारी आता सूरज चव्हाण नंतर त्यांच्या भावाच्या खासगी कंपन्यांची चौकशी करत आहेत. चव्हाण यांच्या भावाच्या नावावर एकूण तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. कोविड काळात या विविध कंपन्यांसोबत कुठला व्यवहार झालेला होते का हे पाहण्यासाठी ईडीचे अधिकारी कागदपत्रे आणि इतर व्यवहारचा तपशील तपासत आहेत. चव्हाण किंवा त्यांच्या भावाच्या या कंपन्यांना कुठले टेंडर दिले होता का किंवा या संबंधित कंपनीच्या बँक खात्यावर पैसे वळवण्यात आले आहेत का हेसुद्धा तपासलं जाते आहे अशी सूत्रांनी माहिती दिली. 
 
आतापर्यंत कसा झाला तपास? आणि काय निष्पन्न होतंय?


- कथिक कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुरज चव्हाण यांची सोमवारी साडेआठ तास ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आलेली होती.


- युवासेनेचे सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत सूरज चव्हाण.


सुरज चव्हाण यांना ईडी कार्यालयात काय प्रश्न विचारले होते?


- गेल्या आठवड्यात झालेल्या छापेमारी कारवाईत त्यांचा घरात चार फ्लॅट्स संबंधीत काही कागदपत्रं सापडले होते. 


- हे चार फ्लॅट्स त्यांचेच असल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे.


- या चार फ्लॅटची किंमत सुमारे कोटींच्या घरात आहे. हे फ्लॅट कोविड काळात खरेदी केले होते का?


- सूत्रांनी सांगितले की, सूरज चव्हाण यांनी मान्य केले की दोन फ्लॅट त्यांच्या मालकीचे आहेत, परंतु इतरांबद्दल त्यांना माहिती नाही.


- काही मित्रांकडून घेतलेल्या कर्जासह विविध बँकेमधून लोण घेऊन हे दोन्ही फ्लॅट खरेदी केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.


- परंतु फ्लॅट्स बाबत सूरज चव्हाण यांनी समाधानकारक उत्तर दिली नसल्याचं ED सूत्रांची माहिती .


- म्हणून कागदपत्रांसह पुन्हा बोलावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
- पालिका अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात मध्यस्त्याची भूमिका बजावल्याचा सुरज चव्हाण यांचावर संशय आहे .


या प्रकरणातील तक्रारदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या हे वारंवार बोलतच होते की हिशोब तर द्यायलाच लागणार.


आता हा पैसा कुणाकडे गेला आणि या पैशाचा झालं काय हा तपासाचा भाग आहे. पण कोविडच्या काळात जिथे प्रत्येक नागरिक हॉस्पिटलमध्ये बेड मिळवण्यासाठी धडपडत होता किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये जास्त पैसे मोजत होते  त्याकाळात कोविड हॉस्पिटलच्या व्यवस्थापन करण्याच्या नावाखाली काही लोकांनी पैशाचा कसा दुरुपयोग केला हे ईडीच्या आतापर्यंतच्या चौकशीत समोर आला आहे. मात्र यामागे खरा मास्टरमाईंड कोण आहे हे लवकरच  स्पष्ट होणार आहे.  


ही बातमी वाचा: