एक्स्प्लोर

Akola News : भाजप आमदार हरीश पिंपळेंचा रौद्रावतार; विमा कंपनीच्या अधिकार्‍यांना डांबलं विश्रामगृहात, नेमकं कारण काय?

Harish Pimple: अकोल्याच्या मुर्तीजापुरमध्ये भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी विमा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना चक्क मुर्तीजापुर येथील शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत डांबलं असल्याचे पुढे आले आहे.

Akola News अकोला :  अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरमध्ये भाजप आमदार हरीश पिंपळे यांचा रौद्रावतार बघायला मिळाला आहे. आमदार पिंपळे यांनी विमा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना चक्क मुर्तीजापुर येथील शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत डांबलं असल्याचे पुढे आले आहे. विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे 2023 मधील 530 शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी विमा योजनेचा (Pradhan Mantri Krishi Bima Yojana) लाभ मिळाला नाही. त्याच्याच रागातून आमदार पिंपळे (Harish Pimple) यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विश्रामगृहाच्या खोलीत डांबलंय.

परिणामी, शेतकर्‍यांना न्याय मिळेपर्यंत अधिकाऱ्यांना खोलीतून बाहेर काढणार नसल्याचा आमदार पिंपळे यांचा निर्धार केला आहे. या प्रकरणानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर घटनास्थळावर पोलीस आणि महसूल अधिकारी दाखल झाले असता हे प्रकरण काहीसे शांत झाले आहे. 

बारदाने नसल्याने 8 दिवसांपासून शेतकरी ताटकळत

 दुसरीकडे, नाफेडच्या खरेदी केंद्रावर बारदाने (पोते) नसल्याने गेल्या आठ ते दहा दिवसापासून शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रात्र जागून काढत सोयाबिनची रखवाली करावी लागत आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावरील हे चित्र आहे. हदगाव येथील नाफेडच्या खरेदी केंद्रावर तालुक्यातील शेतकर्‍यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली. विक्रीची तारीख कळल्यानंतर शेतकऱ्यांनी इथे सोयाबीन विक्रीसाठी आणले. काही शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाल्यानंतर मात्र बारदाने अर्थात पोते संपल्याचे कारण दाखवून खरेदी बंद करण्यात आली. 

दरम्यान, शेतकर्‍यांनी ओरड केल्यानंतर त्यांना स्वत: बारदाने आणा नाफेडकडून बारदाने आल्यास तुम्हाला बारदाने परत करू, असे सांगण्यात आले. पण एका बारदाण्याची किंमत ही 46 रुपये इतकी आहे. त्याचा भुर्दंड शेतकर्‍यांना बसतोय. बारदाने संपल्याने अनेक शेतकरी आठ ते दहा दिवसापासून रांगेत ताटकळत आहेत. एक दिवसाचा थांबण्याचा किराया ट्रॅक्टर मालक दीड ते हजार रुपये आकारत असल्याने त्याचा नाहक भुर्दंड बसत आहे. रात्री सोयाबीन चोरीला जाऊ नये म्हणून त्यांना कडाक्याच्या थंडीत रात्री आपल्या ट्रॅक्टर जवळ झोपावे लागत आहे. 

पीएम किसानचे पैसे कधी येणार?

पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जारी करण्यात आला होता. हप्ता जाहीर होऊन जवळपास तीन महिने होत आहेत. 19 व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.  केंद्र सरकार पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता जारी करू शकते. मात्र, सरकारने हप्त्याचे पैसे हस्तांतरित करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम अर्ज भरावा लागेल. अर्ज करताना काही चूक झाली तर त्याचा लाभ मिळणार नाही. दुसरे म्हणजे, बँक खात्याचा तपशील बरोबर असावा. तिसरे, तुमचा मोबाईल बँक खात्याशी जोडलेला असावा. यामध्ये काही त्रुटी राहिल्यास तुमचा हप्ता अडकू शकतो.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Mitkari On Sahitya Issue : महापुरुषांबाबत अवमानकारक साहित्यावर बंदी आणणार, अमोल मिटकरींनी सभागृहात काय मागणी केली?Top 100 Superfast News : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 25 March 2025 : 3 PmDisha Salian Case | दिशा सालियन प्रकरण; आरोपी कोण? आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख, वकील नेमकं काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 3PM 25 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाता येते? यासाठी नेमके नियम कोणते? 
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं घेऊन जाता येतं? यासाठी नेमके नियम कोणते? 
Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
Embed widget