Bhojpuri Cinema Dhak Dhak Girl: सौंदर्य लांबच, हिला माधुरीच्या नखाचीही सर नाही; पण तरीसुद्धा भोजपुरी सिनेमाची धक धक गर्ल म्हणून ओळखली जाते 'ही' अभिनेत्री
Bhojpuri Cinema Dhak Dhak Girl: ना हिच्याकडे माधुरीसारखं सौंदर्य, ना तिच्यासारखं मन मोहून टाकणारं निखळ हास्य, तरीसुद्धा हिला म्हणतात, भोजपुरी सिनेमाची धक धक गर्ल...

Bhojpuri Cinema Dhak Dhak Girl: भोजपुरी चित्रपटसृष्टीतील (Bhojpuri Cinema) सुप्रसिद्ध अभिनेत्री नीलम गिरीचं (Neelam Giri) 'कमर तोडके नाचब' हे नवं गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं. निर्मात्यांनी सोमवारी सोशल मीडियावर गाण्याचा बीटीएस व्हिडीओ पोस्ट केला. निर्मात्यांनी बीटीएस व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिलं की, "कमर तोडके नाचब... बीटीएसचं शूटिंग... तुम्ही संपूर्ण गाणं यूट्यूबवर पाहू शकता..." निरहुआ एंटरटेनमेंटद्वारे सादर केलेलं हे गाणं प्रवेश लाल यादव आणि शिल्पा राव यांनी गायलंय. या गाण्याचे बोल मुकेश मिश्रा यांनी लिहिलेत, जे ग्रामीण जीवनातील जिवंत प्रतिमा सुंदरपणे टिपतात. प्रवेश लाल यादवनं संगीत देखील दिलंय आणि सनी सोनकरनं ते कोरिओग्राफ केलंय.
'कमर तोडके नाचब' हे गाणं आधुनिक बीट्ससह एकत्रित करण्यात आलंय, जे प्रेक्षकांना नाचण्यास भाग पाडतं. गाण्यातील नीलम गिरी आणि प्रवेश लाल यादव यांचा धमाल नृत्याच्या चालींना हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओमध्ये प्रवेश लाल यादव आणि नीलम गिरी यांची जोडी अद्भुत दिसते. प्रवेशची देसी शैली आणि नीलमचे सुंदर ठुमके प्रेक्षकांना खिळवून ठेवतायत...
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी, ही अभिनेत्री टिकटॉकवर व्हिडीओ बनवायची. भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह यांनी तिला हेरलं आणि तिला 'धनिया हमार' या म्युझिक व्हिडीओमध्ये भूमिका करण्याची ऑफर दिली. त्यानंतर तिनं 2021 मध्ये 'बाबुल' या म्युझिक व्हिडीओमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि लवकरच ती भोजपुरी चित्रपटसृष्टीतली टॉप अभिनेत्री बनली.
तिला म्हणतात, भोजपुरी चित्रपटसृष्टीची 'धक धक गर्ल'
नीलमला भोजपुरी चित्रपटसृष्टीची 'धक धक गर्ल' म्हणून ओळखलं जातं. तिचा लूक फार वेगळा आहे. तिच्यात आणि माधुरी दीक्षितमध्ये अजिबात साम्य नाही, पण तिच्या डान्स करण्याच्या स्टाईलमुळे तिच्या स्टेप्समुळे तिची माधुरीशी तुलना केली जाते. चित्रपटांच्या बाबतीत, तिनं 'इज्जत घर', 'यूपी-६१ लव्ह स्टोरी ऑफ गाजीपूर', 'तुन तुन', 'कलाकंद' आणि 'जस्ट मॅरीड' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याव्यतिरिक्त, ती 'निमिया पर आसन', 'मछारी के कांत के नथुनिया' आणि 'कुंवरे रिहॅब' सारख्या म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसली आहे. नीलम गिरीनं अनेक स्टेज आणि लाईव्ह कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे.
























