एक्स्प्लोर

Koregaon Bhima | केंद्राच्या निर्णयाबाबत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन पाऊल उचलणार : गृहमंत्री अनिल देशमुख

एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमाचा तपास राज्य सरकारच्या हातून काढून घेण्याचं केंद्रानं ठरवलं असतं तरी राज्य सरकार हा डाव हाणून पाडण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. एनआयकडे तपास सोपवण्याआधी कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं अनिल देशमुखांनी स्पष्ट केलंय. तसंच भाजप नेते अडकण्याची भीती असल्यानं केंद्र सरकारनं एल्गारचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केलाय.

नागपूर : केंद्र सरकारने भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविला आहे. केंद्राने असा निर्णय घेण्यापूर्वी राज्याला विश्वासात घ्यायला हवे होते. मात्र, केंद्र सरकारने असे केलेले नाही. त्यामुळे केंद्राच्या या निर्णयाबाबत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन पावले उचलली जातील अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. भीमा कोरेगाव प्रकरणासंदर्भात एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली जात होती. शरद पवारांनी ही तशी मागणी केली होती आणि त्यासंदर्भात आम्ही विचार करत असतानाच केंद्र सरकारने तपास काढून घेतला हे घटनाबाह्य कृती आहे, असे अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, केंद्रातील सत्ताधारी पक्षातील काही नेते या प्रकरणाच्या तपासामुळे धोक्यात येतील असे त्यांना वाटत असल्यामुळेच हे तपस एनआयए कडे सोपवले आहे अशी शंका आम्हाला असल्याचेही देशमुख म्हणाले. न्यायाधीश लोया मृत्यूप्रकरणी आमच्याकडे पुरावे आहेत असे अनेक लोकांनी फोन करून सांगितले. मात्र, अद्याप एकही पुरावा घेऊन माझ्याकडे आलेला नाही. केवळ फोनवरच पुरावे असल्याचे सांगितले जात आहे असा टोलाही देशमुख यांनी लगावला. फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील अनेक नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचे आरोप होतं आहे. याचीही चौकशी केली जाणार आहे. एक्सपोज होण्याच्या भीतीने 'एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे, शरद पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल ते म्हणाले की, शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याची सुरक्षा एकाएकी काढली जाणे योग्य नसून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याच्या रागातून असे केले गेले असावे असे देशमुख म्हणाले. लवकरच राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरु केली जाईल असे आश्वासनही गृहमंत्र्यांनी दिले. नागपूर शहराला गेल्या काही दिवसांपासून क्राईम कॅपिटल म्हणून संबोधले जाते. शहराची ही ओळख पुसून काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ही देशमुख यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने ड्रोन असून जगात अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करत असताना महाराष्ट्रातही सावधगिरी बाळगण्याची तसेच ड्रोन संदर्भात एक निश्चित धोरण निर्माण करण्याची गरज असल्याचेही देशमुख म्हणाले. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंना प्रकाश आंबेडकरांनीच वाचवलं; जयंत पाटलांचा दावा

महत्त्वाच्या बातम्या

दापोलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ, शिवसेना शहरप्रमुख पदाचा अखेर राजीनामा, रामदास कदमांकडून कानउघाडणी
दापोलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ, शिवसेना शहरप्रमुख पदाचा अखेर राजीनामा, रामदास कदमांकडून कानउघाडणी
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Embed widget