Santosh Deshmukh Case: हत्येआधी संतोष देशमुखांनी वैभवीला सांगितलेली होती 'त्या' फोनची गोष्ट; लेकीच्या जबाबातून माहिती समोर
Santosh Deshmukh Case: माझे काही बरे वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे..असं संतोष देशमुख यांनी आपल्या मुलीला सांगितलं असल्याचं जबाबात समोर आलं आहे.

बीड : सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील वैभवी देशमुखचा जबाब एबीपी माझाच्या हाती आला आहे. माझे काही बरे वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे..असं संतोष देशमुख यांनी आपल्या मुलीला सांगितलं असल्याचं जबाबात समोर आलं आहे. भाऊ एवढं काय झालं नाही. कशाला एवढं ताणता भाऊ, एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर उठता का? पप्पाचा हा फोन दहा ते 12 मिनिटे सुरू होता, अशी माहिती वैभवी देशमुखने आपल्या जबाबामध्ये दिली आहे. हा कॉल विष्णू चाटेचाच होता, असं संतोष देशमुख यांनी मुलीला सांगितलं होतं.
माझं काही बरं वाईट झालं तर...
माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असा भावनिक संवाद संतोष देशमुखांनी मुलगी वैभवीशी केला होता. वैभवी देशमुखने पोलिसांना दिलेला जबाब एबीपी माझाच्या हाती आला आहे. या जबाबानुसार अपहरणाच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 डिसेंबर 2024ला देशमुखांना चाटेचा धमकावणारा फोन आला होता. त्यानंतर त्यांनी वैभवीला हे सांगितलं असल्याचं समोर आलं आहे. दोषारोप पत्रात देशमुख कुटुंबात, पत्नी अश्विनी देशमुख, भाऊ धनंजय देशमुख, यांचे जबाब महत्त्वाचे आहेत. त्या देशमुख कुटुंबाच्या जबाबात संतोष देशमुख यांनी हत्येच्यापूर्वी काय बोलले होते याचा समावेश असल्याची माहिती आहे.
वैभवीच्या जबाबात काय ?
वैभवी देशमुखने दिलेल्या जबाबानुसार, माझे पप्पा मस्साजोग मधून लातुरला आले होते. त्या दिवशी ते अस्वस्थ असल्याचे दिसून आले. दुसऱ्या दिवशी पण पप्पा मला काळजीत असल्याचे दिसत होते. मी त्यांना काय झालं म्हणून विचारलं. तेव्हा त्यांनी मला जवळ घेऊन म्हणाले की, बाळा चांगला अभ्यास कर... त्यावर मी त्यांना विचारले की, काय झालं पप्पा. त्यावर ते काही सांगण्यास तयार नव्हते. परंतु मी त्यांना वारंवार वाचारलं की, मला सांगा पप्पा काय झालं आहे. तेव्हा त्यांनी 6 डिसेंबरला अवादा कंपनीमध्ये वाल्मीक अण्णांची माणसे खंडणी मागण्यासाठी आणि कंपनी बंद करण्यासाठी कंपनीत आले होते. मी त्यांना अडवलं होतं. त्यामुळे त्यांना खुप राग आला. वाल्मिक कराड हा गुंड प्रवृत्तीचा माणुस आहे, त्याचा बीड जिल्हयात दबदबा आहे. त्याला खूप माणसं घाबरतात. तसेच त्याच्या जवळचा माणुस विष्णु चाटे हा मला सारखा फोन करुन ठार मारण्याची धमकी देत आहे. त्यामुळे मला टेन्शन आलं आहे. माझे काही बरे वाईट झाले तर आई व विराजची काळजी घे. असं संतोष देशमुख मुलगी वैभवीला म्हणत होते.
तू घाबरु नकोस मी यातून काही मार्ग काढतो..
त्यानंतर दुसऱ्या दिवशी विष्णू चाटे याचा फोन होता. तो फोनवरून म्हणत होता तू वाल्मिक अण्णा व आमच्याशी पंगा घेतला आहे, तुला जिवंत सोडणार नाही. " पप्पांनी त्यावेळी मला असे ही सांगितले की, " तू घाबरु नकोस मी यातून काही मार्ग काढतो, असेही वैभवी म्हणाली विष्णू चाटेचा फोन जवळपास 10 ते 12 मिनिटे सुरू होता.त्यावेळी पप्पा खूप घाबरले होते, असा जबाब लेक वैभवीने पोलिसांसमोर नोंदवला आहे.
मारेकऱ्यांना कोणी पाठवले, खंडणी कोणासाठी होती?
माझ्या वडिलांची हत्या ही खंडणीतूनच झाली आहे. परंतु, या लोकांना खंडणी मागायला कोणी पाठवले? त्यांना कोणाचा वरदहस्त होता? असा सवाल सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने केला आहे. तसेच ही खंडणी कोणासाठी जात होती? याचीही चौकशी करून त्यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणीही वैभवीने केली आहे.
हातपाय तोडा, पण...
माझ्या बाबांना बेदम मारहाण करण्यात आली. ते हातपाय तोडा, पण गाव, मुलांसाठी जगू द्या, अशी विनवणी करत होते. परंतु, त्यांनी कसलीही दयामाया दाखवली नाही, ते निर्दयीपणे मारहाण करीतच राहिले, असेही वैभवी म्हणाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

