Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडीओ न्यायलयात सादर, वाल्मिक कराडचा डिस्चार्ज अर्ज; सुनावणीवेळी बीडच्या न्यायालयात नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh Case : पुढची सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती आहे. आरोपीच्या वकिलांनी जे कागदपत्र मागितली होती ती कागदपत्र दिली गेली आहेत.

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज (गुरूवारी, ता- 10) विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते. सरपंच संतोष देशमुख यांची 4 महिन्यापूर्वी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती. त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. या प्रकरणाचा खटला सध्या बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. त्यावर आज विशेष मकोका कोर्टात सुनावणी पार पडली आहे. आज 11 वाजता ही सुनावणी पार पडली आहे. त्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काल रात्रीच बीडमध्ये दाखल झालेले आहेत. आजच्या सुनावणीमध्ये आरोपीचे वकील ॲड, विकास खाडे यांनी युक्तीवाद केला. पुढची सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती आहे. आरोपीच्या वकिलांनी जे कागदपत्र मागितली होती ती कागदपत्र दिली गेली आहेत. तर फॉरेन्सिक लॅबमधून आलेले पुरावे तपासून पुढील तारखेला आरोपीच्या वकिलांना दिली जाणार आहे अशी माहिती आहे. वाल्मीक कराड याचे डिस्चार्ज ऍप्लिकेशन आज दाखल करण्यात आले असल्याचे वकील विकास खाडे यांनी सांगितले आहे
दरम्यान याबाबत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टातील युक्तीवाद संपल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी या प्रकरणातील महत्त्वाची काही माहिती दिली आहे. आरोपी वाल्मीक कराडच्या वकीलांनी काही कागदपत्रे मागतील ती दिली आहेत. सीलबंद दस्तावेज आहेत ते शील उघडल्यानंतर देऊ. वाल्मिक कराड याने डिस्चार्ज अर्ज केला आहे. न्यायालयात संतोष देशमुखांना मारहाण केल्याचा व्हिडीओ दिला आहे. आम्ही विनंती केली हा व्हिडिओ बाहेर प्रसारित होऊ नये. यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल, अशी माहिती देखील ॲड. उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.
उज्ज्वल निकम काय म्हणाले?
सुनावणी संपल्यानंतर ॲड. उज्ज्वल निकम यांनी माध्यामांना याबाबत माहिती दिली, आरोपीच्या वकिलांनी मागितलेला कागदपत्र सादर केली. संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडीओ न्यायलयात हजर केला आहे. व्हिडीओ आरोपींनीच रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ बाहेर येऊ नये,अशा विनंती कोर्टाला केली, अशी माहिती निकम यांनी दिली. आरोपी वाल्मिक कराडची चल आणि अचल संपत्तीवर रितसर सुनावणी होईल. वाल्मिकने या प्रकरणात तो सहभागी नाही,असा अर्ज केला आहे. डिस्चार्जमध्ये अनेक मुद्दे मांडले आहेत. या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा सहभाग नाही आणि इतर बाबी या अर्जात आहेत. सीआयडीकडून वाल्मिक कराडच्या संपत्तीवर तपास सुरू आहे, असंही उज्वल निकम यांनी सांगितले आहे.पुढची सुनावणी 24 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती आहे.
- बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर झाली सुनावणी
- आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले.
- सरकार पक्षाच्या वतीने विशेष वकील एडवोकेट उज्वल निकम यांनी बाजू मांडली.
- आरोपींच्या वतीने ॲड विकास खाडे यांनी बाजू मांडली.
- सरकारी पक्षाच्यावतीने मुद्देमाल न्यायालयात जमा करण्यात आला.
- या मुद्देमालामध्ये काही सीलबंद पॉकेट्स होते ते न्यायालयासमोर उघडली जाणार त्यानंतर आरोपींच्या वकिलांना दिली जाणार.
- सीलबंद पॉकेटमध्ये 164 ब चे जवाब पंचनामे यासह इतर बाबींचा समावेश
- मुद्देमालामध्ये आरोपींनी गुन्हा करताना वापरलेले शस्त्र तसेच इतर जप्त करण्यात आलेले साहित्य यांचा समावेश
- या प्रकरणातील आरोपी क्रमांक 1 वाल्मीक कराड याचे डिस्चार्ज एप्लीकेशन न्यायालयात दाखल करण्यात आले
- गतवेळच्या सुनावणीवेळी यासंबंधीचा अर्ज करण्यात आला होता
- या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे हा सध्या लातूर कारागृहात आहे, त्याला बीडच्या कारागृहात हलवण्यात यावे यासाठी विष्णू चाटेचे वकील राहुल मुंडे यांनी अर्ज दाखल केला
- या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असल्यामुळे विष्णू चाटे याला बीड येथील कारागृहात हलवावे अशी मागणी करण्यात आली

























