एक्स्प्लोर

Pankaja Munde VIDEO : बीडमधील तणाव कसा कमी करणार? पंकजा मुंडे यांची एका वाक्यात प्रतिक्रिया

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असून त्या संबंधित सर्व पुरावे असल्याचा दावा एसआयटीने न्यायालयात केला आहे. 

बीड : एकीकडे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यासह राज्याचं राजकारण ढवळून निघाल्याचं चित्र आहे. त्याचसोबत वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळी बंदची हाक देण्यात आली,  समर्थकांनी आंदोलन उभं केलं. तर त्याच वेळी या जिल्ह्याच्या मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी मात्र यापासून स्वतःला दूर ठेवल्याचं दिसून येतंय. जिल्ह्यात काय सुरू आहे ते मला काही माहिती नाही, मी माझ्या रोजच्या कामात व्यस्त आहे. माझ्यासाठी काम महत्त्वाचं आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. बीडमधील तणाव निवळावा यासाठी आपण गृहमंत्र्यांशी चर्चा करू असंही त्या म्हणाल्या. 

धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला मकोका लावण्यात आला असून त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर परळीमध्ये त्याच्या समर्थकांनी आंदोलन सुरू केलं. मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांनीही धनंजय मुंडे यांच्यावर यावरून निशाणा साधला आहे. त्याचवेळी त्यांच्या बहीण आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र या सर्वापासून स्वतःला दूर ठेवल्याचं दिसून येत आहे. 

या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या नाहीत

बीडमध्ये जे काही सुरू आहे त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. मी माझ्या रोजच्या नियोजनाप्रमाणे काम करत आहे. त्यामुळे या गोष्टी माझ्यासाठी आता मॅटर करत नाहीत. माझ्यासाठी रोजचं काम महत्त्वाचं आहे अशी पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. 

बीडमध्ये सध्या जो तणाव निर्माण झाला आहे त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलिस कोठडी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोका लावल्यानंतर, वाल्मिक कराडला सात दिवसांची एसआयटी कोठडी सुनावण्यात आली. एसआयटीतर्फे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी संपूर्ण तपासाची माहिती देत युक्तिवाद केला. दरम्यान, वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा मोठा दावाही एसआयटीकडून करण्यात आला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेता एसआयटीने 10 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण न्यायालयाने त्याला सात दिवसांची कोठडी सुनावली. 

वाल्मिक कराडच्या मूळ गावी आंदोलन

कराडला कोठडी सुनावल्यानंतर त्याचं मूळगाव असलेल्या पांगरीत महिला आणि समर्थक आक्रमक झाले. त्यांनी थेट राष्ट्रीय महामार्गावरच ठिय्या मांडत, घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी काही महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना अटकाव केला. तर काही महिलांनी आक्रोश करत अन्याय होत असल्याचा आरोप केला. याशिवाय कराड समर्थकांनी रस्त्यावर टायर पेटवून रास्तारोको करण्याचा प्रयत्म केला. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Embed widget