सत्तेत आल्यावर मराठा आरक्षण बोचरं का वाटतय? तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर धनंजय मुंडेंचा सवाल
Tanaji Sawant Controversial Statement on Maratha Reservation : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
बीड : मराठा आरक्षणाबद्दल (Tanaji Sawant on Maratha Reservation) आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सावंत यांचा चांगलाच समाचार घेतलाय. "कुठल्याही लोकशाहीमध्ये मंत्र्यांनी किंवा मंत्र्याच्या विरोधात असणाऱ्या सदस्यांनी काय टीका करावी ? हे महत्त्वाचं नाही. पण मंत्री पदावर आल्यावर मराठा आरक्षणाच्या बाबतीत तानाजी सावंत हे जनता ते मराठा समाजाच्या बाबतीत ते बोललेले आहेत. त्यांचं मंत्रीपद ही जनता कायम काढून घेऊ शकते, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ते बीडच्या घाटसावळी येथे एस.पी. शुगर अँड ऍग्रो साखर कारखान्याच्या पायाभरणी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काल मराठा आरक्षणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यभरातू त्यांच्याविरोधात रोष निर्माण झाला होता. मराठा समाजाने त्यांच्या वक्तव्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर तानाजी सावंत यांनी आपल्या वक्तव्याबाबात माफी मागितली. याबाबत बोलताना धनंजय मुंडे यांनी तानाजी सावंत यांचा चंगलाच समाचार घेतलाय.
"अनेक जणांनी आरक्षणासाठी आपलं बलिदान दिलं. माझा असं म्हणणं आहे की कुणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही. आज सत्ता पक्ष हे सर्व येत असंत, जात असतं. आरक्षणासाठी तुम्ही सुद्धा लढलात कमीत कमी ते भान ठेवायला पाहिजे. हेच आरक्षण आज सत्तेत आल्यावर का बोचरं वाटतय ? याचं उत्तर द्या. असं म्हणत धनंजय मुंडे यांनी तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
काय म्हणाले होते तानाजी सावंत?
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे (Controversial Statement) राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. सत्तांतर झाल्यानंतरच विरोधकांना मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं आहे.
राज्यभरातून संताप
तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता त्यांच्यावर टीका होत आहे. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तत्काळ सावंत यांना समज द्यावी अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील असा इशारा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिला आहे.
तानाजी सावंतांनी माफी मागितली
राज्यभरातून संताप व्यक्त झाल्यानंतर तानाजी सावंत यांनी अखेर माफी मागितली आहे. एबीपी माझाशी बातचीत करताना तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची माफी मागतो असतं म्हटलं.माझ्या वक्तव्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सबंध मराठा समाजाची माफी मागतो, असं म्हणत तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यासाठी दिलगिरी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या