एक्स्प्लोर

CM Eknath Shinde : घरात बसणाऱ्यांना काय कळणार 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे महत्त्व; CM शिंदे यांचा हल्लाबोल

CM Eknath Shinde : बीड जिल्ह्यातील परळी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

CM Eknath Shinde :  जे अडीच वर्ष केवळ घरात बसले त्यांना 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम काय समजणार. या कार्यक्रमाला बोगसगिरी म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सामान्यांचा अपमान करण्यासारखं असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले. बदनामी करणाऱ्यांना योग्य वेळी उत्तर देणार असल्याचेही त्यांनी म्हटले. 

बीड जिल्ह्यातील परळी येथे 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आता पर्यंत झालेल्या शासन आपल्या दरी मध्ये सगळ्यात यशस्वी हा कार्यक्रम झाला. ही रेकॉर्ड ब्रेक गर्दी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. आतापर्यंत वीस कार्यक्रम झाले. 1 कोटी 84 लाख लोकांनी 'शासन आपल्या दारी' योजनेचा लाभ घेतला.

विरोधकांवर हल्लाबोल 

सरकारचा बोगस कार्यक्रम आहे असे काहीजण म्हणतात. अनेक लोक लाभ घेऊन गेले.  जे अडीच वर्ष घरी बसले त्यांना काय कळणार शासन आपल्या दारीचे महत्व असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. अडीच वर्ष घरात राहून बोगसगीरी केली त्यांनी असं म्हणणं हा लोकांचा अपमान आहे. आता, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मोठ्या प्रमाणावर लोक या कर्यक्रमाला येत आहेत.  ही पोटदुखी त्यांच्या छातीत धडकी भरवणारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला दोन तृतीयांश जागा मिळाल्या असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निकाल बघून मोदींची लाट दिसली. लाट संपली म्हणणाऱ्यांना सडेतोड उत्तर मिळाले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. हे शेतकरी कष्टकऱ्यांचे सरकार त्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले. 

मुख्यमंत्री तुम्ही खरच राज्याचे एकनाथ : धनंजय मुंडे 

मुख्यमंत्री तुम्ही खरच राज्याचे एकनाथ असल्याचे प्रशंसोद्गार राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी काढले. सगळे एकत्रित मिळून या जिल्ह्याचा विकास करून दाखवू असे आवाहनही त्यांनी केले. 283 कोटी रुपये वैद्यनाथ देवस्थान साठी दिले असल्याचे मुंडे यांनी म्हटले. कोकणात तुम्ही कोकाकोलाचा प्रकल्प दिला. आता, आम्हाला 'फँटा' तरी द्या असे म्हणत धनंजय मुंडे यांनी परळी-बीडमध्ये उद्योगाची मागणी केली. 

 इतर महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Violence : नागपूरमधील शिवाजी चौकात दोन गटात राडा, पोलिसांकडून गर्दी पांगवण्याचा प्रयत्नABP Majha Marathi News Headlines 8 PM TOP Headlines 8PM 17 March 2025Ajit Pawar on Ladki Bahin Yojana | 'लाडकी'ची हमी, दुरुस्तीचा उतारा, अजितदादा काय म्हणाले?Job Majha | PM इंटर्नशिप योजनेत नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? किती पदांवर जागा? 17 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
Embed widget