एक्स्प्लोर

काय सांगता! बीडमध्ये ग्रामसभा ऐवजी भरली बालसभा, विद्यार्थ्यांनी मांडले प्रश्न, तर सरपंचांनी घेतले ठराव

Children Meeting in Beed : एखाद्या ग्रामसभेप्रमाणेच या बालसभेमध्ये विद्यार्थ्यांनी शाळेतील आणि गावातील प्रश्न ग्रामपंचायतसमोर मांडले होते.

Children Meeting in Beed : ग्रामीण भागात अनेकदा आपण ग्रामपंचायत अंर्तगत ग्रामसभा (Gram Sabha) भरल्याचे पाहिले असेल. काही ठिकाणी महिलांची ग्रामसभा देखील भरल्याचे उदाहरण आहेत. मात्र, बीडच्या (Beed) एका गावात चक्क ग्रामसभा ऐवजी बालसभा भरल्याचे पाहायला मिळाले. ग्रामपंचायतीच्या वतीने या विशेष बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. तसेच अनेकांनी समस्या देखील मांडल्या. विशेष म्हणजे या सभेत आलेल्या मुद्यांवर ठराव देखील घेण्यात आले. 

बीड तालुक्यातील आंबे सावळी येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या वतीने या विशेष बाल सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. आंबे सावळी ग्रामपंचायत हे बीड जिल्ह्यात पहिली ग्रामपंचायत आहे, ज्यांनी या बालसभेचे आयोजन केलं होतं. या बालसभेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेतील समस्या आणि गावातील इतर समस्या सरपंचासमोर मांडल्या. यावेळी सरपंचांनी त्यांच्या समस्या जाणून घेऊन यावर तात्काळ तोडगा काढायला सुरुवात केली आहे.

गावातील समस्या आणि काही ठराव करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ग्रामसभा घेतली जाते. यामध्ये गावाचा विकासाचा आराखडा मानला जातो. मात्र, आंबे सावळी ग्रामपंचायतीने एक नवा आदर्श उभा केला असून, विद्यार्थ्यांसाठी एक विशेष बाल सभा आयोजित केली होती. यामध्ये देखील अनेक ठराव घेण्यात आले. बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या बालसभेची परिसरात जोरदार चर्चा होत आहे. 

असे ठराव घेण्यात आले...

एखाद्या ग्रामसभेप्रमाणेच या बालसभेमध्ये विद्यार्थ्यांनी शाळेतील आणि गावातील प्रश्न ग्रामपंचायतसमोर मांडले होते. यामध्ये शाळेमध्ये वाचनालयाची उपलब्धता करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर गावात नळ योजना आलेली असून, प्रत्येकाच्या घरी नळ असून त्या नळाला ग्रामपंचायतच्या वतीने तोटी बसून देण्यात यावी, त्याचबरोबर गावातील सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात यावे असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतसमोर मांडले. विशेष म्हणजे, यावर ग्रामपंचायतीने ठराव घेतले असून, तात्काळ या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायला सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीचं आदर्श घेऊन इतर गावांमध्ये देखील अशीच ग्रामसभा आयोजित केल्यास विद्यार्थ्यांना आपल्या समस्या मांडता येईल. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

नवीन पिकांसह खते, बियाणाची माहिती देण्यासाठी आता प्रत्येक गावात ग्रामसभा भरणार; कृषिमंत्र्यांचे आदेश

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Sunetra Pawar Beed : रात्री अकरापर्यंत बैठका... सकाळी 7 वाजता रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवारांच्या 'ॲक्शन मोड'ने बीडला दिला नवा विश्वास
रात्री अकरापर्यंत बैठका... सकाळी 7 वाजता रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवारांच्या 'ॲक्शन मोड'ने बीडला दिला नवा विश्वास
धक्कादायक! अल्पवयीन मुलीवरील हल्ला, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीनं उचललं टोकाचं पाऊल, पोलिस घटनास्थळी दाखल
धक्कादायक! अल्पवयीन मुलीवरील हल्ला, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीनं उचललं टोकाचं पाऊल, पोलिस घटनास्थळी दाखल

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget