एक्स्प्लोर
Tirumala Group : तिरूमला ग्रुपवर आयकर विभागाची छापेमारी, दीडशे अधिकाऱ्यांचा फौजफाटा अन् बीडसह विविध शहरात कारवाई
Income Tax raid On Tirumala Group : तिरूमला ग्रुपच्या पुणे, बीड, औरंगाबाद, फलटण, सोलापूर येथील कार्यालयावर आयकर विभागाने एकाच वेळी कारवाई केली आहे.

Income Tax raid On Tirumala Group
बीड: महाराष्ट्रातील खाद्यतेल, सरकी पेंड उद्योगातील प्रमुख नाव असलेल्या बीड येथील तिरुमला उद्योग समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाडी (Income Tax raid On Tirumala Group) टाकल्या आहेत. बुधवारी तिरूमला उद्योग समूहाच्या विविध पाच शहरातील कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्या. तिरूमला ग्रुप हा कुटे ग्रुप या नावानेही ओळखला जातो
सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दीडशेहून अधिक आयकर अधिकारी, कर्मचारी बीड, पुणे, सोलापूर, फलटण, औंगाबादमधील तिरूमला उद्योग समूहाच्या कार्यालयात पोचले आणि त्यांनी ही कारवाई सुरू केली. दिवसभर ही कारवाई सुरू होती अशी माहिती सूत्रांनी दिली.
आणखी वाचा
























