एक्स्प्लोर

Beed Crime News: घरात मारलं, खोक्यात भरलं, पण विल्हेवाट लावताना CCTV मध्ये दिसलं; 5 तास पोलिसांना फिरवलं अन्..., अखेर महिला होमगार्डच्या खूनाचा उलगडा

Beed Crime News:आपल्याच अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन तो बीड शहरपासून काही अंतरावर नेऊन नाल्यात फेकला. आरोपी महिलेला विचारल्यावर तिने उडवाउडवीची उत्तरे दिली.

बीड : एका पुरुषासाठी दोन महिलांमध्ये निर्माण झालेल्या वादातून बीडमध्ये धक्कादायक खुनाची घटना घडली आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने वृंदावणी सतीश फरतारे हिने आपल्या मैत्रीण आयोध्या राहुल व्हरकटे (वय २७, रा. लुखा मसला, ता. गेवराई) हिचा गळा दाबून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला खोक्यात भरून आपल्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने दुचाकीवरून दूर नेऊन नाल्यात फेकण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आरोपीचे सारे कारनामे उघड झाले आणि अवघ्या २४ तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला.

प्रियकराने आपल्याला दुरावल्याचा राग वृंदावणीला मनात

आयोध्या ही काही महिन्यांपूर्वी होमगार्डमध्ये भरती झाली होती. तरीही पोलिस होण्याचे तिचे स्वप्न होते आणि ती बीडमध्ये तयारी करत होती. वृंदावणीचे एका पुरुषाशी प्रेमसंबंध सुरू होते. पण दीड वर्षांपूर्वी त्याची ओळख आयोध्याशी झाली आणि त्यानंतर त्याने वृंदावणीला बाजूला करून आयोध्याशी बोलणे सुरू केले. आयोध्याचे पती चार वर्षांपूर्वी अपघातात मयत झाले होते. त्यामुळे प्रियकराने आपल्याला दुरावल्याचा राग वृंदावणीला मनात होता. १९ ऑगस्ट रोजी सकाळी तिने आयोध्याला घरी बोलावून घेतले. त्यावेळी वाद वाढल्यावर आयोध्या ओरडू लागली, त्यामुळे संतापलेल्या वृंदावणीने तिचा गळा दाबून खून केला.

कचरा टाकायचा आहे

मृतदेह लपवण्यासाठी वृंदावणीने त्याला खोक्यात भरले. मुलगा शाळेतून आल्यावर ‘कचरा टाकायचा आहे’ असे सांगून त्याला दुचाकीवर घेऊन गेली. शेजाऱ्याकडून स्कूटी आणून घेतली आणि मुलाला चालवायला लावले. स्वतः मागे बसून तिने मृतदेह उमरद जहांगीर परिसरातील नाल्यात फेकून दिला. त्यानंतर ती स्कूटी धुऊन शेजाऱ्याला परत दिली. २० ऑगस्ट रोजी दुपारी साडेपाचच्या सुमारास मृतदेह सापडला.

तब्बल पाच तास उडवाउडवीची उत्तरे

दरम्यान, आयोध्या बेपत्ता झाल्याची नोंद २० ऑगस्ट रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी तात्काळ वृंदावणीची चौकशी सुरू केली. तिने तब्बल पाच तास उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, तिच्याच प्रियकराने पोलिसांना माहिती दिल्याने आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. २१ ऑगस्ट रोजी पुन्हा चौकशीदरम्यान वृंदावणीने खुनाची कबुली दिली.या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात वृंदावणी सतीश फरतारे हिला अटक केली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि थेट...

दोघेही तीन वर्षापासून मैत्रीपूर्ण संबंधात होत्या. याच काळात वृंदावनी हिचा प्रियकर घरी येत होता. त्याच दरम्यान त्याची ओळख होमगार्ड अयोध्या यांच्याशी झाली.. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि थेट मैत्रिणीलाच आव्हान देण्यात आले.... मात्र मैत्रिणीच्या प्रियकरावर प्रेम करण्याने आपल्याला जीव गमावा लागेल याची पुसटशी कल्पना आयोध्याला नव्हती... आणि मग होत्याचे नव्हते झाले.. एका दिवशी आयोध्या मैत्रिणीच्या घरी पोहोचली आणि माझ्या प्रियकराचा नाद सोड आम्ही विवाह करणार आहोत.. असं म्हणत दोघींनी एकमेकांशी बाचाबाची झाली. याच दरम्यान आयोध्या यांनी विषारी औषध प्राशन केले आणि इथेच डाव फसला.. अयोध्या तडफडत असताना वृंदावनी हिने आधी तोंड दाबले नंतर तिची गळा दाबून निर्घृण हत्या केली.

तीन दिवसापासून फोन बंद

आयोध्या यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वीच अपघाती निधन झाले होते. त्यानंतर आयोध्या पोलीस दलातील होमगार्ड सेवेत रुजू झाल्या. त्यांना पोलीस दलात जायचं होते. त्यासाठी बीडमध्ये त्या सराव करत होत्या. मात्र तीन दिवसापासून त्यांचा फोन बंद आला. आणि नातेवाईकांनी शोधा शोध सुरू केली. कुठेही आयोध्याचा संपर्क झाला नसल्याने नातेवाईकांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयोध्या मिसिंग असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अवघ्या 24 तासात याचा छडा लावत आरोपी महिलेला ताब्यात घेतले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Gadchiroli : काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीमध्ये तिरंगी लढतीची शक्यता, नागरिकांच्या अपेक्षा काय?
Pankaja Munde Speech Beed : परळीची जनता इतिहास घडवणार;पंकजा मुंडेंचं बीडमध्ये तुफान भाषण
Mahapalikecha Mahasangram Uran : उर भागात लोकसंख्या वाढ मात्र सुविधा अपुऱ्या, काय म्हणाले नागरिक?
Dhananjay Munde and Walmik Karad: भाषण सुरु असताना धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण?
Raosaheb Danve & Babanrao Lonikar : 40 वर्ष एकाच पक्षात, पण 12 वर्षे अबोला,  दानवे-लोणीकर एकत्र

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
Embed widget