एक्स्प्लोर

Bajrang sonawane : धंनजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी मी करणार नाही, कारण...; खासदार बजरंग सोनवणे स्पष्टच बोलले

Bajrang Sonavane : पोलीसांना वाल्मिक कराड यांचा संबंध आधी ज्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झालीय त्यांच्याशी आढळल्याने मकोका अंतर्गत कारवाई झाली असावी. असा तर्क बजरंग सोनवणे यांनी लावला आहे.  

बीड: आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड संदर्भात एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. वाल्मिक कराडवर (Walmik Karad Mcoca) आज अखेर  मकोका  (Mcoca) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, या एकंदरीत प्रकरणावर सातत्याने भाष्य करत आरोपांच्या फैरी झाडणारे बीड लोकसभा मतदारसंघाचे (Beed Lok Sabha) शरद पवार यांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पोलीसांना वाल्मिक कराड यांचा संबंध आधी ज्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झालीय त्यांच्याशी आढळल्याने वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाली असावी. असा तर्क बजरंग सोनवणे यांनी लावला आहे.  

वाल्मिक कराडने हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात आढळले असल्याने हत्येच्या आरोपात देखील वाल्मिक कराड वर गुन्हा दाखल होईल, असे वाटतंय. धनंजय मुंडे यांच्या राजिनाम्याची मागणी विरोधक करत असले तरी मी कुणाच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही. कारण तपासात सगळं समोर येईल. असे म्हणत खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांनी धनंजय मुंडे यांच्या राजिनाम्याबाबत विधान केलं आहे. 

वाल्मिक कराडच्या आई बद्दल मी काहीही बोलणार नाही

तसेच वाल्मिक कराडच्या आई बद्दल मी काहीही बोलणार नाही. परळीत तणाव नाही केवळ दहा बारा जणांनी दुकानं बंद करायला लावलीत. बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा वाद नव्हता. आता तो राजकारणासाठी निर्माण केला गेलाय असेही ते म्हणाले‌.

समर्थक आक्रमक, परळी बंदची हाक

वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर त्याचे समर्थक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. कराडच्या समर्थकांनी परळीमध्ये रस्त्यांवर टायर पेटवल्या आणि परळी बंदची हाक दिली. ऐन संक्रांतीच्या दिवशीच परळी बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. या सातही आरोपींना मकोका लावण्यात आला आहे.

वाल्मिक कराडच्या आईची प्रकृती बिघडली

तर आज सकाळपासून वाल्मिक कराडच्या मातोश्री आता मैदानात उतरल्याचे दिसून आले. लेकाच्या न्यायासाठी परळी पोलीस स्टेशनबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. मात्र, कराडच्या मातोश्री पारुबाई यांची प्रकृती अचानक  बिघडल्याची माहिती समोर आली अजे. त्या रस्त्यात चक्कर येईन पडल्याचे समजते. जमलेल्या समर्थकांनी त्यांना पाणी दिलं, रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र मुलाला न्याय मिळावा, म्हणून त्या सतत्याने मागणी करत असल्याचे दिसून येते. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Samsaptak Yog 2026 : शनि आणि शुक्र देव येणार आमने-सामने...'या' 5 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; 24 तास सतर्कतेचा इशारा
शनि आणि शुक्र देव येणार आमने-सामने...'या' 5 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; 24 तास सतर्कतेचा इशारा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Embed widget