Yamaha GT 150 Fazer लॉन्च; रोजच्या वापरासाठी आहे बेस्ट, लूकही आहे जबरदस्त
Yamaha GT 150 Fazer Launch: जपानी दुचाकी उत्पादक कंपनी यामाहाने (Yamaha ) आपली एक नवीन बाईक लॉन्च केली आहे. GT150 Fazer असे या बाईकचे नाव आहे.
Yamaha GT 150 Fazer Launch: जपानी दुचाकी उत्पादक कंपनी यामाहाने (Yamaha ) आपली एक नवीन बाईक लॉन्च केली आहे. GT150 Fazer असे या बाईकचे नाव आहे. यासोबतच कंपनीने चीनच्या बाजारपेठेत आपला पोर्टफोलिओ वाढवला आहे. बाईकची स्टाईल आणि लूक एकदम क्लासिक आहे. कंपनीने स्थानिक बाजारात या बाईकची प्रारंभिक किंमत 13,390 युआन इतकी आहे. याची किंमत भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 1.60 लाख रुपये इतकी आहे. या बाईकमध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. बाईकचा लूकही दमदार आहे.
Yamaha GT 150 Fazer मध्ये काय आहे खास?
या बाईकमध्ये 150cc इंजिन वापरण्यात आले आहे. या बाईकचा लूक थोडा स्पोर्टी आहे. या बाईकमध्ये अलॉय व्हील्स, एक्झॉस्ट इंजिन, सिग्नेचर रेट्रो बिट्समध्ये गोल हेडलॅम्प, रिअर व्ह्यू मिरर, फोर्क गेटर्स, फेंडर्ससह फ्रंट आणि रिअर सस्पेन्शन देण्यात आले आहेत. यासोबतच क्विल्टेड पॅटर्नमधील टॅन लेदर सीट्स, ट्रॅकर स्टाईल साइड पॅनेल्स, टर्न सिग्नल्स, ऑल-एलईडी लाईट्स, टीयरड्रॉप-आकाराची इंधन टाकी, 12V DC चार्जिंग सॉकेट ही फीचर्स यात देण्यात आली आहेत. ही बाईक चार रंगात सादर करण्यात आली आहे. ज्यात पांढरा, हलका राखाडी, गडद राखाडी आणि निळ्या रंगाचा समावेश आहे.
Yamaha GT 150 Fazer Launch: रोजच्या वापरासाठी आहे बेस्ट
ही बाईक रोजच्या वापरासाठी तयार करण्यात आली आहे. या बाईकवर दोन लोक आरामात प्रवास करू शकतात, ज्यासाठी आरामदायी लांब सीट देण्यात आली आहे. या बाईकच्या सीटची उंची 800 मिमी आहे. पण त्यात ग्रॅब रेल उपलब्ध नाही. या बाईकने बराच ऑफ रोडिंग प्रवास केला जाऊ शकतो.
Yamaha GT 150 Fazer Launch: इंजिन
Yamaha GT150 Fazer 149cc इंजिन देण्यात आले आहे. जे 7,500 rpm वर 12.3 Hp आणि 12.4 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. याला दोन्ही बाजूला 18-इंच अलॉय व्हील्स मिळतात. समोरच्या टायरचा आकार 90/90 आणि मागील टायरचा आकार 100/80 आहे. बाईकचा व्हीलबेस 1,330 मिमी आहे. यात 12.5 लीटरची पेट्रोल टाकी मिळते. या बाईकचे एकूण वजन 126 किलो आहे. मात्र भारतात ही बाईक कधी लॉन्च होणार, याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. ही बाईक लवकरच भारतात लॉन्च होईल अशी अपेक्षा केली जात आहे.
Yamaha GT 150 Fazer Launch: बजाज पल्सर P150 शी होणार स्पर्धा
ही बाईक भारतात लॉन्च झाल्यास याची टक्कर बजाज पल्सर P150 शी होईल. जी एक स्ट्रीट बाईक आहे आणि भारतात याची किंमत 1,17,200 रुपयांपासून सुरू होते. यात 149.68cc BS6 इंजिन आहे. जे 14.29 bhp पॉवर आणि 13.5 Nm टॉर्क जनरेट करू शकते. यात फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम ब्रेकसह अँटी-लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम देखील मिळते.