(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Volkswagen Virtus GT: फोक्सवॅगन Virtus GT 1.5 चा फर्स्ट लूक, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये?
Volkswagen Virtus GT: फॉक्सवॅगन Virtus ही स्कोडा स्लाव्हिया आणि Hyundai Verna यांच्या स्पर्धेत आता सामील झाली आहे. मॅन्युअल गिअरबॉक्स तसेच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स यांसारखी वैशिष्ट्ये या गाडीमध्ये आहेत.
Volkswagen Virtus GT: फॉक्सवॅगन व्हर्चस या श्रेणीमधली Virtus 1.5 GT ही नवी कोरी कार फोक्सवॅगनने नुकतीच लाँच केली आहे. या गाडीमध्ये अनेक अत्याधुनिक आणि भन्नाट फीचर्सचा समावेश करण्यात आलेला आहे. जेव्हा फॉक्सवॅगन व्हर्चस 1.5 TSI आणि 1.0 TSI व्हेरियंटसह आली होती तेव्हा फक्त काही मर्यादित वैशिष्ट्ये यामध्ये होती. परंतु आता फॉक्सवॅगनने Virtus 1.5 GT या कारमध्ये एक नवा मॅन्युअल गिअरबॉक्स हा प्रकार जोडला आहे. फॉक्सवॅगन व्हर्चसमध्ये आता GT Plus टॉप-एंड व्हेरियंटवर 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देखील उपलब्ध आहे. या नव्या गाडीची किंमत 16.89 लाख रुपये आहे.
या गाडीसाठी एक नवा रंग देखील आहे. तसेच, आता GT बॅज मॅन्युअल गिअरबॉक्स व्हर्चसमध्ये वापरण्यात येणार आहे. 1.5 TSI हे सर्वात शक्तिशाली इंजिन या गाडीमध्ये आहे. 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि या इंजिनमुळे ही गाडी लोकांना नक्कीच आवडेल असं देखील आता म्हटलं जात आहे. व्हर्चसमध्ये आता दोन्ही इंजिनसाठी दोन गिअरबॉक्स पर्याय उपलब्ध झाले आहेत.
'ही' आहेत भन्नाट फीचर्स
6-स्पीड गिअरबॉक्समुळे ही गाडी अतिशय वेगाने धावणार आहे. ही गाडी Virtus स्कोडा स्लाव्हिया आणि Hyundai Verna या दोन कारशी स्पर्धा करणार असल्याची चर्चा देखील आता रंगल्या आहेत. यामध्ये मॅन्युअल गिअरबॉक्स तसेच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स या पर्यायांसह 1.5 टर्बो पेट्रोल देखील उपलब्ध आहे. गाडीमध्ये ड्रायव्हरचा सहभाग वाढवण्यासाठी मॅन्युअल हा नेहमीच पसंतीचा पर्याय असतो आणि आता तो Virtus GT मध्येही उपलब्ध असणार आहे. TSI 150bhp सह ही मॅन्युअल गाडी ग्राहकांना अधिक GT या श्रेणीच्या गाड्या वापरण्यास सक्षम बनवेल. GT Plus DSG आणि मॅन्युअल या दोन्ही श्रेणीच्या गाड्यांच्या किंमतीमध्ये 1.5 लाख रुपयांचा फरक देखील आहे. त्यामुळे आता या नव्या श्रेणीतील गाडीला ग्राहकांची किती पसंती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे अत्याधुनिक आणि नवीन फीचर्स उपलब्ध असणारी ही कार ग्राहकांच्या नक्कीच पसंतीस पडेल असं देखील म्हटलं जात आहे.
Introducing the Volkswagen GT Edge Limited Collection, with eye-catching GT elements, brand-new colours & the legendary 1.5L TSI engine, enjoy the best of drives.
— Volkswagen India (@volkswagenindia) June 8, 2023
Limited availability. Exclusively online.
Click here https://t.co/YLCYSxtlD0 to know more. #VolkswagenIndia